पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या

पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या

'तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची, तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो', असं म्हणून एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून तरुणाची हत्या केली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड,  09 जून : आपल्या मुलीवर प्रेम करतो या रागातून एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील घडली.  विराज जगताप असं या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एकूण सहा आरोपी असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. इतर चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील  सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर मध्येही ही घटना घडली आहे. मयत तरुण विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर

मुख्य आरोपी हेमंत काटे, सागर काटे आणि अन्य 4 आरोपींनी विराजवर हल्ला केला.

हेही वाचा-जम्मू आणि काश्मीर: 6 महिन्यांमध्ये 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

7 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विराज जगताप हा आपल्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी टेम्पोतून पाठलाग करून पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. टेप्पोच्या धडकेमुळे विराज खाली पडला. त्यानंतर आरोपी हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड घेऊन विराजला बेदम मारहाण केली.

'तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची, तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो', असं म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकले आणि लोखंडी रॉड विराजच्या डोक्यात घातला आहे. सहा आरोपींनी दगड आणि लोखंडी रॉडने विराजला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे विराज जागेवर बेशुद्ध पडला. विराज बेशुद्ध पडल्यानंतर  आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा-मुंबई, कोकणासह राज्यात हवामान खात्याकडून GOOD NEWS, या तारखेला मुसळधार पाऊस

जखमी बेशुद्ध अवस्थेत विराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत विराज जगतापच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम 302/143,147,148, 149 सह अनु.जाती जमाती कायदा कलम 3 (1) (आर), (एस) 3 (2) ()3 (2) (व्ही) 6 मपो.अधि. 1951 चे कलम 37 (1) 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर 8 जून रोजी मुख्य आरोपी  आरोपी हेमंत काटे, सागर काटे याला अटक करण्यात आली आहे. इतर चार आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 9, 2020, 9:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading