मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अकोला: प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत घृणास्पद कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं आलं समोर

अकोला: प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत घृणास्पद कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं आलं समोर

Crime in Akola: अकोल्यातून एक विकृत घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरने पुरूष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (doctor's unnatural sex with male patient) केला आहे.

    अकोला, 15 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता अकोल्यातून एक विकृत घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरने पुरूष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (doctor's unnatural sex with male patient) केला आहे. पण संबंधित रुग्ण बनून गेलेल्या एका लोकल पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करून नराधम डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. डॉक्टरच्या काळ्या कृत्याचा व्हिडीओ (Obscene video) समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक (Accused doctor arrest) केली आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी डॉक्टरचं नाव अनंत शेवाळे असून ते अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. एका नामाकिंत रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टरने अशाप्रकारचं कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, व्हिडीओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-पुणे: आधी पार्टी केली मग डोक्यात घातली गोळी;अभियंत्याच्या हत्याकांडाला वेगळं वळण नेमकं काय घडलं? आरोपी डॉक्टरने काही दिवसांपूर्वी फिर्यादी व्यक्तीच्या एका मित्रासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती फिर्यादीला मिळल्यानंतर त्यांनी संबंधित घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे एका स्थानिक युट्यूब चॅनेलसाठी प्रतिनिधी म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांच्या मित्रासोबत घडलेल्या घटनेच कितपत सत्यता आहे. हे तपासण्यासाठी फिर्यादीने स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्लॅन आखला. हेही वाचा-Tinderवरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73लाखांचा गंडा त्यानुसार फिर्यादी रुग्ण बनून आरोपी डॉक्टरकडे गेले. यावेळी आरोपी डॉक्टरने फिर्यादीचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने संबंधित सर्व प्रकार छुप्प्या कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर 4 ऑक्टोबर रोजी फिर्यादीने व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 377 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Akola, Crime news, Rape

    पुढील बातम्या