सोलापूर, 19 ऑक्टोबर : संशयाचं भूत कुणाच्या डोक्यात शिरलं तर काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. 2009 मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना 12 वर्षांनंतर पॅरोलवर बाहेर आला आणि पत्नीच्या प्रियकराचाही खून केला. ही धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (solapur) घडली असून अवघ्या काही तासात कैद्याला (prison) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसिद्ध पुजारी असं या 64 वर्षीय कैद्याचं नाव आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास मयत ज्ञानदेव नागणसुरे हे आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यात गाठून आरोपी आमसिद्ध पुजारी याने धारदार शास्त्राने वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्ञानदेव नागणसुरे यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी आमसिद्ध पुजारी हा फरार झाला.
क्रिप्टो करन्सीच्या नादात होतेय फसवणूक! 6 महिन्यांत तब्बल दोन लाख खाती ब्लॉक
आरोपी आमसिद्ध पुजारी याने 2009 साली चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली होती. डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतः हुन पोलिसात देखील हजर झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आमसिद्ध काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता.
गावी आल्यापासून आमसिद्ध हा हत्येच्या तयारीत होता. 'मला आणखी दोन खून करायचे आहेत' असं तो नेहमी सांगत होता. यातूनच त्याने ही हत्या केली नागणसुरेची हत्या केल्यानंतर आमसिद्ध पुजारी हा फरार झाला होता.
पोलिसांनी पथक नेमले आणि काही तासांत त्याला जेरबंद केलं. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून संशयित प्रियकर ज्ञानदेव नागणसुरे याचा खून केला, अशी कबुली पुजारीने दिली.
मंद्रूप पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून फरार पुजारीला अटक करण्यात आली. वडापूर गावच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.