मुंबई 19 ऑक्टोबर : बिग बॉस म्हटलं की वाद हे आलेच. मात्र यंदा मात्र बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) मध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेमाचं आणि वादाच पीक जोमात आहे. जसं दिवस पुढे जातील तसं भांडण देखील वाढतच आहेत. मागच्या आठवड्यात तर कहरच झाला. ‘जहर का कहर’ टास्कच्यावेळी घरातील सदस्यांच्यात जोराचा राडा झाला. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये घरातील मंडळी फुलटू राडा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. ज्या लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी दावा केला आहे की, विशाल कोटियन (Vishal Kotian), अफसाना खानला केसांना धरून ओडत आहे. या व्हिडिओत फक्त दिसत आहे की तो अफसानाच्या केसांना ओढत आहे. अफसाना देखील जोराने ओरडत आहे. तर बाकीचे सदस्यांची देखील एकमेकांसोबत चांगलीच जुंपल्याची दिसत आहे.
As it is clearly visible in this video that, #AfsanaKhan ko usake baal pakad kar ghasita jaa raha hai,
— Team Afsana Khan Official FC 💎 (@AfsanaKhanFC) October 16, 2021
How Painful..
But She didn't blame anyone for this bcz at that time all of them were trying for a piece of map
She is not intrstd in playing sympathi card#BiggBoss15 #BB15 pic.twitter.com/Mcnm3ljmM6
अफसाना खान **(Afasana Khan)**च्या फॅन क्लब ने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे तर बिग बॉसच्या काही माजी स्पर्धकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अफसानाच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, या व्हिडिओत दिसत आहे की कशाप्रकारे अफसानाचे केस धरून तिला फरफटत ओढले जात आहे. वाचा :आली लग्नघटिका समीप! Suyash Tilak-Aayushi Bhave ला लागली हळद; पाहा क्युट कपलचे Photo किती भयनाक आणि दुखद आहे हे सगळं.. मात्र तरीही अफसानाने कुणावर आरोप केलेले नाहीत. ती सिंपथी कार्डता वापर करून कधीच खेळत नाही. हाच व्हिडिओ रिट्वीट करत देवोलीना भट्टाचार्जी कामया पंजाबीने देखील कमेंट केली आहे. वाचा : Shilpa Shetty - Raj Kundra वरील आरोप Sherlyn Chopra ला महागात; कपलने दाखल केला 50 कोटींचा मानहानीचा खटला देवोलीना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee) व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हे खूपच वाईट आहे. बऱ्याचदा आपण नाण्याची दुसरी बाजू पाहतच नाही. तिच्या ट्वीटला कामया पंजाबीने रिप्लाय दिला आहे. कामयाने म्हटले आहे की, हे नरकाप्रमाणे घाणेरड आहे. यावर कोणच लक्ष नाही.. असं म्हणत या दोघींनीही हा सगळा प्रकार किती घाणरेडा आणि वाईट असल्याचे म्हटले आहे.