मुंबई 27 ऑक्टोबर : मागच्या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठींबा देत सत्ता स्थापन केली. यानंतर काही दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह कोणत्याही अपक्षाला संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसून आला. यामध्ये दोन आमदारांचा पाठींबा असलेले बच्चू कडू यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. यानंतर बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता या चर्चा प्रवीण दरेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत.
लक्ष्मी-गणेश, शिवाजी महाराज, मोदी अन् बरंच काही...! नोटांवरील फोटोवरुन ट्विटरवर 'राजकीय वाद'
प्रवीण दरेकर म्हणाले, की बच्चू कडू कुठेच जाणार नाहीत. ते म्हणाले नाहीत की मी 7-8 आमदारांना घेवून कुठे जात आहे. त्यांच्या वक्तव्याचा तसा अर्थ होत नाही, असं स्पष्टीकरण दरेकर यांनी दिलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थिबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांची काळजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आहे. शासनाने १०० टक्के पंचनामाचे आदेश दिले आहे. प्राधान्याने हे पंचनामे व्हावे असे आदेश दिले आहेत.
काँग्रेसचे नवे बॉस खर्गेंसमोर ही दोन आव्हानं मोठी; नंतरचा काळही सोपा नाही, सोनिया म्हणाल्या..
यावेळी प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे गटासह आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की मुख्यमंत्री कोण आहे हे मान्य करण्याची आदित्य ठाकरे यांची मानसिकता नाही. एखाद्याने डोळ्यावर पट्टी बांधायचं ठरवलं असेल तर काय करावं. बाळासाहेब ठाकरे रूसवा फुगवा असेल तर प्रत्येकाला प्रत्यक्ष बोलावत होते. मात्र, आता ५४ पैकी ४० आमदार जातात आणि तुम्हा म्हणता की ते महत्वाचे नाही तर हे खूप चुकीचं आहे. त्याचाच परिणाम हे भोगत आहेत, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला यावेळी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी वर्षावर साजऱ्या केलेल्या दिवाळीबाबत बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रात बळीराजा देव आहे. त्याच देवाला मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवून दिवाळी साजरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Pravin darekar