मुंबई 27 ऑक्टोबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवरील फोटोबाबत केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नोटेवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे. यानंतर आता यावरुन बरेच वाद-विवाद सुरु झाले आहे. अनेक नेत्यांनी ट्विटरवर या फोटोबाबत वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा असं म्हटलं आहे. अशा नोटेचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. काँग्रेसचे नवे बॉस खर्गेंसमोर ही दोन आव्हानं मोठी; नंतरचा काळही सोपा नाही, सोनिया म्हणाल्या.. नितेश राणे यांनी ट्विटरला 200 रुपयांच्या नोटेचा एक फोटो शेअर केला आहे. या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे. ‘हे परफेक्ट आहे’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या पोस्टला दिलं आहे.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
दुसरीकडे राम कदम यांनीही आपल्या ट्विटरवरुन काही नोटांचे फोटो पोस्ट केले आहेत.
Ye perfect hai ! 😊 pic.twitter.com/GH6EMkYeSN
— nitesh rane (@NiteshNRane) October 26, 2022
या नोटांवर गांधीजींच्या जागी सावरकर, शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी म्हटलं ‘अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी !’ मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनीही यावर बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, की ‘भारत देशाची ओळख गौतम बुद्ध आहे तसेच जगातील प्रत्येक माणूस भारताला गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखतो आणि भारतातील आजपर्यंत जे पंतप्रधान झाले त्यांनी भारत देश गौतम बुद्धांचा आहे हे मोठया अभिमानाने सांगितले. तथागत गौतम बुद्धांनी जगाला पहिल्यांदा लोकशाही दिली आणि तथागत गौतम बुद्ध आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधान यांना मागणी करत आहे की भारतीय चालनावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो घ्यावा.’