मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बँकेची कागदपत्र बाहेर काढली तर महागात पडेल, नवाब मलिकांचा दरेकरांना थेट इशारा

बँकेची कागदपत्र बाहेर काढली तर महागात पडेल, नवाब मलिकांचा दरेकरांना थेट इशारा

 'विरोधक अनिल देशमुखांप्रमाणे माझ्याविरोधात देखील षडयंत्र रचत असून माझी हत्या केली तरी मी घाबरणार नाही'

'विरोधक अनिल देशमुखांप्रमाणे माझ्याविरोधात देखील षडयंत्र रचत असून माझी हत्या केली तरी मी घाबरणार नाही'

'विरोधक अनिल देशमुखांप्रमाणे माझ्याविरोधात देखील षडयंत्र रचत असून माझी हत्या केली तरी मी घाबरणार नाही'

भंडारा, 04 डिसेंबर : भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी सुरू केलेल्या आखाड्यात मी दोन दोन हात करायला तयार आहे, जर मी काही कागदपत्र काढायला सुरूवात केली तर महागात पडेल, असा इशाराच राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी दिला आहे.

नवाब मलिक आज आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'प्रवीण दरेकर ज्या बँकेचे अध्यक्ष आहे त्या बँकेत केलेले घोटाळे मी बाहेर काढत असल्यामुळे त्यांनी माझ्यावर एक हजार कोटीचा दावा केला आहे. पण नवाब मलिक कोणाला घाबरत नाही जिथे अन्याय तिथे मी बोलेन मी कुणाला घाबरत नाही. जो डर गया वो मर गया, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी दरेकरांवर लावला आहे.

कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? नागपुरात काँग्रेसच्या गोटात रंगली चर्चा

'या बँकेत अनेक जणांना पैसे वाटप करण्यात आले आहे. बँकेचे जे पैसे बुडाले आहे, त्याची सहकार विभागामार्फत चौकशी सुरू आहे. दरेकर यांनी कोर्टातून आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये, असं प्रोटेक्शन घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात आहे. दरेकरांनी बँकेत फर्जीवाडा केला आहे. मी जर कागदपत्र काढली तर अडचणी होईल, मी देखील या बँकेत खातेदार असल्याने मी घोटाळे उघडे करेल या भीतीने दरेकर माझ्यावर हजार कोटीचे अब्रू नुकसानीचे दावे करत आहे, असंही मलिक म्हणाले.

'प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं... लढ'; प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

'प्रवीण दरेकर हे मजूर सोसायटीचे सदस्य झाले. तुम्ही मतदार असाला, पण ते यास पात्रही नाही. त्यांनी कधी टोपले सुद्धा उचलले नाही. थापी सुद्धा हातात घेतली नाही, मोलमजुरी केली नाही, फर्जीवाडा करून मोलमजुरी सोसायटीचे सदस्य झाले, असा आरोपही मलिक यांनी केला.

'विरोधक अनिल देशमुखांप्रमाणे माझ्याविरोधात देखील षडयंत्र रचत असून माझी हत्या केली तरी मी घाबरणार नाही, असंही मलिक म्हणाले.

First published:

Tags: Nawab malik