मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं... लढ'; प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

'प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं... लढ'; प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक (prasad oak)कायचम त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो. सोशल मीडिायवर देखील प्रसाद त्याच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 4 डिसेंबर- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक (prasad oak)कायचम त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो. सोशल मीडिायवर देखील प्रसाद त्याच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. जगभरात सध्या थैमान घातलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचे (Omicron variant in India) रुग्ण आता भारतातही आढळले आहेत. आता यासंबंधीची पोस्ट अभिनेता प्रसाद ओकने केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्रसादने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यानं यामध्ये लाल रंगाचा टी शर्ट घातला आहे. या शर्टवर जो मजकूर लिहिला आहे त्यामुळे खरं तर तो चर्चेत आला आहे. शर्टवर लिहिलं आहे की, फक्त "लढ" म्हणा. आता कोणताही virus आला. कशीही परिस्थिती आली तरी स्वतःला..कुटुंबाला.. आणि जवळच्या प्रत्येक माणसाला. बजावून एकच सांगायचं... "लढ"

वाचा :सई ताम्हणकरला IMDBच्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आपला आगामी सिनेमा, नाटक यांची माहिती तो सोशल मीडियावर चाहत्यांना देत असतो. तसेच प्रसाद आपल्या कुटुंबीयांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.'धुरळा', 'हिरकणी', 'ये रे ये रे पैसा २', 'फर्जंद' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. हिरकणी या सिनेमाची निर्मिती प्रसादने केली होती. आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग (Omicron more transmissible) मोठ्या प्रमाणात होत असला, तरी त्याची लक्षणं अगदीच सौम्य असल्याचंही स्पष्ट झालं आहे. ओमिक्रॉन हा विषाणू सर्वांत प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. तिथून तो इतर देशांमध्ये पसरल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment