मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? नागपुरात काँग्रेसच्या गोटात रंगली चर्चा

'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? नागपुरात काँग्रेसच्या गोटात रंगली चर्चा

 राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित केलं आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित केलं आहे.

उमेदवाराने लढण्याआधी शस्त्र खाली टाकल्याने काँग्रेस नेत्यांची देखील गोची झाली आहे.

नागपूर, 04 डिसेंबर : काँग्रेसने (congress) भाजपमधून (bjp) आयात केलेल्या रवींद्र भोयर (ravindra Bhoyar ) यांना उमेदवारी दिल्या नंतर विधान परिषदच्या  (Legislative Council) नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक रंगतदार होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र सध्या चित्र उलटे दिसत आहे. रवींद्र भोयर हे प्रचारात सक्रिय दिसत नसून मतदारांच्या संपर्काच्या बाहेर आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते ही प्रचार सोडून जिल्ह्याच्या फिरत बाहेर आहे. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक वाऱ्यावर सोडली का? असा संतप्त सवाल काँग्रेसच्या कार्यकर्ते विचारात आहे. काँग्रेस पक्षातल्या एखाद्या नेत्याला तिकीट न देता एका स्वयंसेवकाला पक्षाने तिकीट दिल्याने  'कट्टप्पा ने बाहुबली को क्यू मारा?' याची चर्चा  कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

रवींद्र भोयर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत मोठे झालेले भाजपचे नेते आहे. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात आयात करून घेतले व शेवटच्या क्षणाला त्यांची तिकीट जाहीर केली. काँग्रेसकडून कोणी लढायला इच्छुक नव्हतं म्हणून रवींद्र भोयर यांना आयात केलं असं नाही? तर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे आपसात जमत नाही. त्यामुळे एकमेकांची जिरण्याच्या चक्कर मध्ये एका स्वयंसेवकांना तिकीट देऊन दिली. मात्र लढाई सुरू होण्याआधीच याच स्वयंसेवकांनी शस्त्र खाली टाकली व काँग्रेसची पंचायत झाली.

बिच्चारा! बायकोसोबत असं काही करायला गेला की स्वतःच फसला नवरा; पाहा VIDEO

मागच्या एक आठवड्यात काँग्रेस गोटातून जिल्ह्यात कुठेही प्रचाराच्या हालचाली दिसत नाही. स्वतः उमेदवार रवींद्र भोयर हे देखील मतदारांशी संपर्क साधत नाही. जिल्ह्यातले स्थानिक नेते महत्वाची विधानपरिषद निवडणूक सोडून इतर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व नगरपंचायत निवडणुकीत सक्रिय आहे. कोणी वेगवेगळ्या कामानिमित्त जिल्ह्याच्या बाहेर दौरे करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

उमेदवाराने लढण्याआधी शस्त्र खाली टाकल्याने काँग्रेस नेत्यांची देखील गोची झाली आहे. आम्हाला भाजप सारखा घोडेबाजार करायचा नाही. आमच्या साठी ही लढाई  विचारधारेची लढाई असे काँग्रेस नेते सांगत आहे. मात्र ऐकून तुम्हाला नवल वाटेल? एका संघाच्या स्वयंसेवकांच्या जोरावर काँग्रेस ही विचारधारेचा लढाई लढत असून आम्ही दिलेल्या उमेदवारांच्या जोरावर जिंकू देखील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे करत आहे.

काँग्रेस आपल्या सक्षम उमेदवाराच्या जोरावर रिंगणात उतरले असते तर कदाचित जिंकली देखील असती.  काँग्रेसला विजय मिळवता आला असता तर नागपूर महानगर पालिकेमध्ये किमान 20 ते 25 नगरसेवक काँग्रेसला वाढवता आले असते व पालिकेत सत्ता सत्तेच्या जवळ पोचता येईल.

अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान; कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

पुढील काळात जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये देखील या निकालाचे परिणाम दिसले असते. मग भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराने निवडणुकीआधीच शास्त्र टाकले, तर मग काँग्रेसने आपल्याच एखाद्या नेत्यांना का तिकीट दिली नाही? का भाजप म्हणून त्यांना शेवटच्या क्षणाला उमेदवार आयात करावा लागला? याचे उत्तर खुद्द काँग्रेस नेत्यांकडे देखील नाही. काँग्रेस नेत्यांनी संघाच्या कट्टर स्वयंसेवकाला फोडून पक्षात आणून जे मिळवलं होते. ते निवडणुकीआधी उमेदवाराने शस्त्र खाली टाकल्याने सगळं गमावलं आहे.  काँग्रेस नेत्यांचा अंतर्गत वाद व पडद्या पाठीमागचे राजकारण याने काँग्रेसचा वारंवार घात झाला आहे. या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्याची परत पुनरावृत्ती होतांना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आपल्याच नेत्यांवर चिडले असून 'कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा?'  त्याची चर्चा जोरात रंगली आहे.

First published:

Tags: Nagpur