गाडी अडवून दाखवले काळे झेंडे, ABVPच्या कार्यकर्त्यांना सामंतांनी दिलं 'हे' उत्तर

गाडी अडवून दाखवले काळे झेंडे, ABVPच्या कार्यकर्त्यांना सामंतांनी दिलं 'हे' उत्तर

MPSC EXAM मधील मराठा उमेदवारांबाबत पुढच्या 2 दिवसांत मुख्यमंत्रीसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार

  • Share this:

नाशिक, 20 सप्टेंबर: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. नाशिक येथे मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक वर्षाचा संदर्भात बैठकीसाठी उदय सामंत आले आहेत. अभाविपच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. विद्यार्थी हिताचे निर्णय घेऊ शकत नसाल तर तात्काळ राजीनामा द्या, अशी मागणी देखील करण्यात आली. पोलिसांनी 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सूडबुद्धीने राजकीय दबाव तंत्राचा वापर महाराष्ट्रात सतत सुरू आहे, अशा आरोप आंदोलकांनी केला आहे.

गाड्या अडवून आणि हल्ले करुन विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल उदय सामंत यांनी आंदोलन करणाऱ्या अभाविरच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना केला. तसेच माझ्या गाड्या आडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल न करण्याच्या पोलिसांना सूचना देखील उदय सामंत यांनी दिल्या

हेही वाचा...राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर... भाजप नेते अतुल भातखळकर यांची जहरी टीका

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, ऑनलाईन परीक्षेदरम्यात तांत्रिक अडचण आल्यास त्याच ठिकाणी पुन्हा परीक्षा घेतली जाईल. त्याच बरोबर MPSC EXAM मधील मराठा उमेदवारांबाबत पुढच्या 2 दिवसांत मुख्यमंत्रीसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

काय आहेत अभाविपच्या मागण्या...

- शैक्षणिक वर्ष 2020-2021 या वर्षाचे तासिका ऑनलाइन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी हा महाविद्यालय परिसराचा, पार्किंग, जिमखाना, प्रयोग शाळा इत्यादी सुविधांचा लाभ घेणार नाहीये तसेच विद्यार्थ्यांचे कौटुंबिक आर्थिक नुकसान तब्बल सहा महिने लांबलेल्या टाळेबंदी मुळे प्रचंड झाले आहे. म्हणून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे एकून शुल्कापैकी 30 टक्के शुल्क सरसकट माफ करावे व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

- कोरोना महामारीमुळे राज्य शासनाच्या एकंदरीत धोरणा नुसार शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या द्वितीय सत्राची परीक्षा ही रद्द झालेली आहे. सदर विद्यार्थ्यांचे सरासरी काढून मुल्यांकन करण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. त्यानुसार मुल्यांकन केले असता बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. तरी जाहीर झालेल्या निकालाशी असहमत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुनर्रमुल्यांकन लवकरात लवकर करण्यात यावे .

- वरील मुद्यात सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु महाविद्यालाने कोरोना महामारी येण्याच्या पूर्वीच परीक्षा शुल्क घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत झाली असताना सदर शुल्क हा त्यांच्यावर बोजा ठरत आहे. तसेच परीक्षा नाही तर परीक्षा शुल्क का? असा स्वाभाविक प्रश्न आहेच. म्हणून अभाविप विद्यार्थी हितार्थ ही मागणी करत आहे की शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या द्वितीय सत्राच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना त्वरित परत करावे.

- कोरोना महामारी मुळे दिनांक 15 मार्च पासून टाळेबंदी मुळे महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी घरी आहेत. म्हणून मार्च महिन्यापासून वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेतलेला नाही. तसेच महाविद्यालयाच्या बस सुविधेद्वारे महाविद्यालयात येणारे विद्यार्थ्यांनी देखील सदर सुविधेचा वापर केला नाही. म्हणून अभाविप ही मागणी करत आहे की शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या मार्च ते जून महिन्यातील वसतिगृह व मेस शुल्क व बस शुल्क 100 टक्के परत करावे.

- कोरोना महामारीमुळे व्यक्ती समूह, जमाव होण्यास प्रतिबंध आहे. परिणामी एरवी झुंबड उडवणारी प्रवेश प्रक्रिया यंदा थेट ऑनलाइन झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा उहापोह वर केलेला असताना अभाविप ही मागणी करते की, शैक्षणिक वर्ष 2020-2021 ची प्रवेश प्रक्रिया एकून महाविद्यालय शुल्कच्या 10 टक्के प्रवेश शुल्क घेऊन सुरु करावी व उर्वरित शुल्क हे चार टप्यात घेण्यात यावे.

हेही वाचा...संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक सवाल, मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का?

- स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रवेश शुल्क गेल्या काही वर्षात वारेमाप वाढले आहे. विद्यार्थी हा शिक्षणासाठी आर्थिक अडचण असू नये व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतो. परंतु सदर प्रवेश शुल्क वाढीमुळे सामान्य घरातील विद्यार्थ्याकडे गुणवत्ता असूनदेखील पैसे अभावी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न दुरापास्त होत चालले आहे. तरी अभाविप अशी मागणी करत आहे की आपण दर वर्षी वाढणाऱ्या शुल्क वाढीवर अंकुश लावावा व प्रवेश शुल्क कमी करावे.

- पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचा विस्तार करण्यात यावा व त्यासोबतच उपकेंद्राला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विलंब होणार नाही व विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी मागणी अभाविप करत आहे.

- स्वायत्त विद्यापीठांवर शैक्षणिक शुल्क व शैक्षणिक उपक्रमांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी सरकारने समिती नेमावी.

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2020, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading