नवी दिल्ली, 22 डिसेंबर : चीनसोबतच जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जगात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहेत. आजपासून संसदेत आणि संसद परिसरात मास्कची सक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मास्क घातल्याचं पहायला मिळालं. लोकसभेचं कामकाज सुरू असताना सर्व खासदारांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे.
मास्कची सक्ती
जगात पुन्हा एकदा कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देखील योग्य ती काळजी घ्यायला हवी. कोरोनाचा मागचा अनुभव लक्षात घेता सर्वांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे. तसेच संसद परिसरात मास्कची सक्ती देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा : corona virus lockdown : देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? कोरोनाने वाढवली चिंता, केंद्र सरकार सतर्क
अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांत वाढ
कोरोना विषाणूचा प्रसार सर्वप्रथम चीनमधून झाला होता. त्यानंतर तो जगभर पसरला. कोरोनाला आळा घालण्यासाठी चीनने प्रतिबंध अधिक कडक केले. त्यामुळे तेथील साथ नियंत्रणात आली होती. मात्र निर्बंध शिथील करताच पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. चीनसोबतच जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Corona, Covid-19, Vaccination