जाहिरात
मराठी बातम्या / देश / मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी

मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी

मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तेथील 85% लोक मुस्लिम आहेत, 2% हिंदू आहेत, तरीही त्यांनी चलनावर गणेशजींचा फोटो लावला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : विविध पक्षांचे राजकीय नेते कोणत्याही विषयांवरील आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अशा विधानांमुळे बऱ्याचदा वाद-विवाद होतात. अर्थात ही स्थिती काही नवीन नाही. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे हे विधान देशाच्या चलनाशी संबंधित आहे. भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधी तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी माता आणि श्री गणपतीचं चित्रं असावं, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासाठी सर्व नोटा बदलण्याची गरज नाही, पण नवीन नोटा छापताना त्यावर लक्ष्मीमाता आणि गणपतीचं चित्रं घ्यावं, असंदेखील केजरीवाल यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांचं हे विधान जोरदार चर्चेत आलं आहे. तसंच हे विधान करताना त्यांनी काही उदाहरणंदेखील दिली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी चलनासंबंधी विधान करताना, नवीन छपाई होणाऱ्या नोटांच्या एका बाजूला महात्मा गांधी यांचे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी माता आणि गणपतीचं चित्र असावं, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याबाबत केजरीवाल म्हणाले, ``परवा दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी-गणेश पूजन करताना माझ्या मनात हा विचार आला. ही गोष्ट केल्यानं अर्थव्यवस्था सुधारेल असा माझा दावा नाही. परंतु, यामुळे देवाचा आशीर्वाद मिळेल. आम्ही कोणताही फोटो हटवण्याची मागणी केलेली नाही. लक्ष्मीमाता ही समृद्धी आणि संपन्नतेची देवता असल्याने माझ्या मनात असा विचार आला. मात्र यासाठी सर्व नोटा बदला असं आमचं अजिबात म्हणणं नाही. पण नवीन नोटा छापताना त्यावर लक्ष्मीमाता आणि गणपतीचं चित्रं असावं, असं वाटतं.`` वाचा - ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान, मोदींकडून शुभेच्छा, या मुद्द्यांवर एकत्र काम करणार! या मागणीच्या अनुषंगाने दाखला देताना केजरीवाल म्हणाले, ``इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तिथं 85 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे तर हिंदू 2 टक्के आहेत. असं असतानाही तिथल्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. इंडोनेशिया असा निर्णय घेऊ शकतो तर आपण का घेऊ शकत नाही,`` असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. ``देशातील प्रत्येक कुटुंब श्रीमंत व्हावं, यासाठी काही पावलं उचलावी लागतील. जनतेला चांगल्या शाळा, रुग्णालयं आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. मात्र, जेव्हा देवी-देवतांचा आशीर्वाद लाभेल, तेव्हाच या गोष्टी शक्य आहेत,`` असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दिल्ली महानगरपालिका आणि गुजरातची निवडणूक एकाचवेळी होण्याबाबत केजरीवाल म्हणाले, ``दिल्लीतील जनता येथे निवडणूक लढवणार आहे तर तिकडे गुजरातची जनता निवडणूक लढवेल. एमसीडीमध्ये 15 वर्ष गैरकारभार आहे. तिथं 27 वर्षांत एकही चांगलं काम झाल्याचं दिसून येत नाही. त्यांनी (भाजप) खूप प्रयत्न केले, चुकीचे डिलिमिटेशन केलं. मात्र जनतेचा मूड बदलला आहे आणि त्यांच्या मनात योग्य मत तयार झालं आहे,`` असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात