Home /News /maharashtra /

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद? कोकणातल्या घडामोडींवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुमशान

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद? कोकणातल्या घडामोडींवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुमशान

महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांची सत्ता स्थापन झाल्याने केसरकर आणि राणे यांच्यातील राजकीय वाद निवळेल, अशी आशा होती. पण सिंधुदुर्गातील राजकारण वेगळ्याच दिशेला जातंय.

    सिंधुदुर्ग, 6 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय मतभेद हे सर्वश्रूत आहेत. महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांची सत्ता स्थापन झाल्याने केसरकर आणि राणे यांच्यातील राजकीय वाद निवळेल, अशी आशा होती. पण सिंधुदुर्गातील राजकारण वेगळ्याच दिशेला जातंय. दीपक केसरकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नारायण राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. राणेंच्या या कृतीबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असा धक्कादायक खुलासा केसरकर यांनी नुकतंच पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर राणे-केसरकर यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केसरकारांना आवरा, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे राणे-केसरकर यांच्यातील वाद आणखी कोणत्या स्थरावार जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दीपक केसरकर यांची तक्रार केली आहे. दीपक केसरकारांना आवरा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. "गरज नसताना वातावरण खराब होत चाललं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काय बोलावे काय करावे याचे अधिकार दीपक केसरकरांना नाहीत. शिंदे गटात सहभागी झालेल्या सर्व आमदारांचे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत झालं", असं म्हणत तेली यांनी केसरकरांना चिमटा काढला. (एकनाथ शिंदेंकडून 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख, मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं?) "महाराष्ट्र सरकार बद्दल चांगलं वातावरण असताना केसरकर हे वातावरण दुसरीकडे घेऊन जात आहेत. म्हणून त्यांना थांबवण्याची गरज आहे. केसरकरांना समज द्यावी", अशी मागणी राजन तेलींनी केली आहे. केसरकरांना धक्का, शिंदे गटाचे प्रवक्ते बदलणार? दुसरीकडे केसरकरांच्या विधानामुळे शिंदे गट अडचणीत आला आहे. दुरावा निर्माण होईल, अशी विधाने करु नये, अशी ताकीदच दीपक केसरकरांना मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे केसरकरांच्या विधानावरुन शिंदे गटाकडून किरण पावसकर यांना प्रवक्तेपद दिले जावू शकते, अशी देखील माहिती समोर येत आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Narayan rane

    पुढील बातम्या