कोरोनामुळे पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या गुन्हेगारानं चिरला पोलिसाच्या पत्नीचा गळा

कोरोनामुळे पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या गुन्हेगारानं चिरला पोलिसाच्या पत्नीचा गळा

कोरोना व्हायरसने थैमान घातलं असताना राज्याची उपराजधानी नागपूर एका हत्याकांडानं हादरली आहे.

  • Share this:

नागपूर, 4 एप्रिल: कोरोना व्हायरसने थैमान घातलं असताना राज्याची उपराजधानी नागपूर एका हत्याकांडानं हादरली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने पोलिस काँस्टेबलच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुशीला मुळे (वय- 52) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सुशीला मुळे यांचे पती अशोक मुळे हे नागपुरात पोलिस विभागात कार्यरत आहे.

हेही वाचा...दुबईहून आलेल्या कोरोनाग्रस्त मुलानं घातलं आईचं तेरावं, 1500 जणांवर भीतीचं सावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारन तुरुंगातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आरोपी नवीन गोटागोडे याची देखील पॅरोलवर सुटका झाली होती. आरोपीने शनिवारी सकाळी पोलिस काँस्टेबल अशोक मुळे यांच्या घरात घरात घुसून त्यांची पत्नी सुशीला यांची तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरुन निर्घृण हत्या केली. नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाढवे नगरात ही घटना घडली.

हेही वाचा...उत्तरेकडून दक्षिणेकडे निघालेल्या 8 मुस्लीम यात्रेकरुंना लातुरमध्ये कोरोनाची लागण

पत्नी सुशीला यांची हत्या झाली तेव्हा अशोक मुळे हे ड्युटी वर गेले होते. सुशीला मुळे आणि त्यांचा तरुण मुलगा घरी होते. सकाळी आरोपी नवीन गोटाफोडे हा मुळे यांच्या घरी आला. तुमच्या मुलाचा मित्र असल्याने त्यानं सुशीला मुळे यांनी सांगितलं. मात्र, मुलगा झोपला आहे असे सांगून सध्या भेटता येणार नाही, असं सुशीला यांनी आरोपीला सांगताच त्यानं तीक्ष्ण शस्त्राने गळा कापला.

हेही वाचा...मृत्यूशी झुंजत पोहोचली रुग्णालयाच्या दारात, ICU ला कुलूप असल्यानं गमावले प्राण

आरोपी नवीन गोटाफोडे हा सराईत गुन्हेगार असून तो 28 मार्चपर्यंत तुरुंगात होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याची पॅरोलवर सुटका झाली होती. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली आहेत.

First published: April 5, 2020, 12:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading