VIDEO : मृत्यूशी झुंज देत पोहोचली रुग्णालयाच्या दारात, ICU ला कुलूप असल्यानं गमावले प्राण

VIDEO : मृत्यूशी झुंज देत पोहोचली रुग्णालयाच्या दारात, ICU ला कुलूप असल्यानं गमावले प्राण

रुग्णालयात आयसीयुला कुलूप असल्यानं जवळपास अर्धा तास महिला रुग्णवाहिकेतच होती. पुढचे उपचार मिळेपर्यंत तिचा मृत्यू झाला.

  • Share this:

भोपाळ, 04 एप्रिल : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वत्र बंद आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवाच न मिळाल्यानं एक महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  रुग्णालयात आयसीयुला कुलूप असल्यानं जवळपास अर्धा तास महिला रुग्णवाहिकेतच होती. पुढचे उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. उज्जेनमधील 55 वर्षीय लक्ष्मीबाई यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच त्यांचा रक्तदाब वाढल्यानं कुटुंबियांनी त्यांना माधवनगर इथल्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर कोरोनाच्या संशयामुळे लक्ष्मीबाई यांना आरडी गार्डी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं.

लक्ष्मी बाई यांना आयसीयुला कुलूप असल्यानं मेडिकल कॉलेजच्या गेटवरच थांबावं लागलं. व्हेंटिलेटरशिवाय रुग्णवाहिकेत त्यांना अर्धातास ठेवलं होतं. अखेर आयसीयूचं कुलूप उघडलं पण उपचार सुरु होईपर्यंत लक्ष्मीबाई यांची प्राणज्योत मालवली होती. वेळेवर उपचार न मिळाल्यानं लक्ष्मीबाई यांना प्राणास मुकावं लागलं.

हे वाचा : दिवसा सुरक्षेचं काम, घरी परतल्यावर मास्कचं शिवणकाम, CM कडून कौतुकाची थाप

याबाबतची माहिती मिळताच उज्जैनचे जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी कारवाई करत माधव नगर रुग्णालयाचे प्रभारी डॉ. महेश परमट आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर आरपी परमार यांनी निलंबित केलं आङे. तर सीएमएचओ अनुसया गवली यांनी रुग्णालय प्रशासनावरही कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

हे वाचा : शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ, कोरोनाग्रस्त दाम्पत्याचा 6 मिनिटांत मृत्यू

First published: April 4, 2020, 9:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading