भोपाळ, 4 एप्रिल : परदेशातून आलेल्या अनेक रुग्णांमुळे देशात कोरोनाचा (Covid -19) प्रसार होत असल्याचे अनेक प्रकरणांवरुन समोर आले आहे. त्यामुळे देश व राज्यातील वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून दुसरा कोरोना व्हायरचा हॉटस्पॉट झाल्याची घटना समोर आली आहे. मुरैनामध्ये शुक्रवारी अचानक कोरोना व्हायरसच्या (Corornavirus) संसर्गाचे 10 रुग्ण आढळून आल्यानंतर हा खुलासा झाला. या जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 23 सॅम्पल्सपैकी 10 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 17 मार्च रोजी दुबई (Dubai) येथून भारतात आलेल्या तरुणाची 31 मार्च रोजी तपासणी करण्यात आली. यावेळी हा तरुण आणि त्याच्या पत्नीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाले. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित रुग्ण या तेराव्यात सहभागी झाले होते. इतकंच नाही तर यावेळी 1500 जणं तेराव्यात सहभागी झाले होते. संबंधित - #BREAKING : राज्यात नवे 145 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 635 वर ही घटना समोर आल्यानंतर 12 जणांना आयसोलेशन रुममध्ये ठेवण्यात आलं आहे. यानंतर तेराव्यात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुण दुबईत एका हॉटेलमध्ये काम करतो. तो 17 मार्च रोजी मुरैना आला होता. त्यानंतर 20 मार्च रोजी त्याने आपल्या आईचं तेरावं ठेवलं होतं. ज्यामध्ये तब्बल 1500 लोक जेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या 1500 जणांवर कोरोनाच्या भीतीचं सावट आहे. संबंधित - बायको-मुलांना कोरोना होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्याचे गॅरेज हेच घर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.