मुंबई, 11 सप्टेंबर : बाळाचं संगोपन हे आईसाठी एक महत्त्वाचं काम असतं. बऱ्याचदा बाळाचं रडणं (Cry) हे पालकांसाठी (Parents) डोकेदुखी ठरतं. बाळ (Child) कोणत्या कारणामुळे रडतंय हे जोपर्यंत माहिती होत नाही, तोपर्यंत हा त्रास पालकांना अनेकदा सहन करावा लागतो. रडत असलेल्या बाळाला खेळवणं, भीती दाखवणं, खेळणी देणं असे अनेक प्रयत्न त्यांचं रडणं थांबवण्यासाठी आई-वडील करत असतात. काही वेळा आई-वडिलांचं आपल्याकडं लक्ष वेधण्यासाठीही लहान मुलं रडतात. रात्रीच्या वेळी बाळाचा हा त्रास पालकांसाठी नकोसा ठरतो. पालकांच्या या समस्येवर एक अजब उपाय यूकेमधल्या एमी क्रिस्प या महिलेनं नुकताच सोशल मीडियावरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा उपाय केल्यानंतर लहान मूल क्षणार्धात पुन्हा हसू लागल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. ही कल्पना नेटिझन्सना खूप आवडली आहे. याविषयीचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.
यूकेमधली 27 वर्षांची एमी क्रिस्प ही महिला कपडे आणि चपलांच्य विक्रीचा व्यवसाय करते. डिसेंबरमध्ये एमी दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या 2 वर्षांच्या लहान मुलाच्या सतत रडण्यामुळं एमी त्रस्त होत्या. याच दरम्यान त्यांना यावर एक उपाय मिळाला. 'जेव्हा आमचं बाळ त्रास देतं, तेव्हा आम्ही त्याच्याशी बोलत असू. परंतु, आम्हाला मिळालेल्या नव्या उपायामुळं ते रडणं विसरलं. आम्ही घरात असं वातावरण तयार केलं, की त्या वातावरणात नेल्यावर आमचं बाळ आपोआपच शांत होऊ लागलं,' असं एमी यांनी सांगितलं.
हे ही वाचा-आई व्हायचंय! प्रेग्नन्सीसाठी फायद्याची ठरू शकते ही पावडर
'यूके'तल्या 'द सन डॉट कॉम' या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, एमी क्रिस्प त्यांच्या 2 वर्षांच्या लहान मुलाच्या सतत रडण्यामुळं त्रस्त होत्या. एके दिवशी एमी यांच्या पतीला एक कल्पना सुचली आणि ती त्यांनी एमी यांना सांगितली. `त्यांनी रडणाऱ्या मुलाला सांगितलं की तू त्या ठिकाणी जाऊन बसू शकतोस, की जिथून तू आनंदानं परत येशील.` ही कल्पना खूपच प्रभावी ठरली.
`एके दिवशी आमचा लहान मुलगा खूप रडू लागला. त्या वेळी आम्ही त्याला या कल्पेनेनुसार कृती करण्यास सांगितली. त्या वेळी तो लाउंजमध्ये (Lounge) गेला आणि 10 सेकंदानंतर तो काही घडलंच नाही या आविर्भावात परतला. त्याचं रडणं बंद व्हायला एक मिनिटही लागलं नाही. ही युक्ती आम्ही वारंवार वापरली आणि प्रत्येक वेळी आम्हाला त्यात यश मिळालं,` असं एमी क्रिस्प यांनी सांगितलं.
एमी यांनी ही कल्पना सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. इन्स्टाग्रामवर (Instagram) लाखो लोकांनी ही कल्पना प्रत्यक्ष पाहिली. त्यांची ही कल्पना सर्वांच्याच्या पसंतीस उतरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: One child, Parents, Social media