मुंबई, 09 ऑगस्ट : देशात सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासात 64 हजार 399 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जवळपास 52 ते 62 नवीन रुग्ण वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.आता 24 तासांत तब्बल 64 हजारहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 6 लाख 28 हजार 747 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 861 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 24 तासांत 12 हजार 822 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्रातली आहे. जुलै अखेरपासून आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत असल्याचं दिसत आहे. कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
हे वाचा- कोरोनाच्या भीतीने आजोबांनी उचललं टोकाचं पाऊल, पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये खळबळ जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्टदरम्यान भारतात 4, 5,6,7 आणि 8 ऑगस्टदरम्यान अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे 24 तासांत 275 रुग्णांचा तर तमिळनाडूत 118, आंध्र प्रदेशात 97 तर कर्नाटकात 93 आणि पश्चिम बंगालमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशनंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशात 24 तासांत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. भारतात देशात 7 लाख 19 हजार 364 लोकांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 64 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 14 लाख 80 हजार 884 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंतचा भारतातील रुग्ण बरे होणाऱ्या रिकव्हरी रेट 68.78% टक्के आहे. कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.