जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / साऱ्या जगाला आशा देणारी ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत, वाचा काय आहे प्रकरण

साऱ्या जगाला आशा देणारी ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत, वाचा काय आहे प्रकरण

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे (Oxford University दोन्ही शास्त्रज्ञांमध्ये कोरोना व्हायरस लशीच्या चाचणी प्रक्रियेवरून वाद सुरू झाला आहे. सध्या ऑक्सफोर्ड कोरोना लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 09 ऑगस्ट : साऱ्या जगाचं लक्ष सध्या कोरोनाची लस (corona vaccine) कधी येणार याकडे लागले आहे. जगभरातील सर्वच देश रात्रंदिवस कोरोना लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. यातच कोरोना व्हायरस लशीवरून दोन ब्रिटीश शास्त्रज्ञांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे (Oxford University दोन्ही शास्त्रज्ञांमध्ये कोरोना व्हायरस लशीच्या चाचणी प्रक्रियेवरून वाद सुरू झाला आहे. सध्या ऑक्सफोर्ड कोरोना लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यात एखाद्या चाचणीसाठी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित करायचे की नाही यावरून वाद सुरू आहे. प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल यांनी निरोगी स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर कोरोनानं संक्रमित करावे, असे सांगितले होते. दरम्यानस कोरोना विषाणूच्या लशीची चाचणी यशस्वी तेव्हाच समजली जाते जेव्हा, लस वापरणारे बहुतेक लोक कोरोनाच्या संपर्कात आले तरी त्यांना त्याची लागण होणार नाही. एकीकडे ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशा परिस्थितीत चाचणी यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. वाचा- शाळा सुरू होताच कोरोनाचा विस्फोट! 11 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाइन याआधी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची योजना होती की, काही स्वयंसेवक ज्यांना लस दिली जात आहे, ते स्वत: येत्या काळात व्हायरसच्या संपर्कात येऊ शकतात. मात्र आता प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल यांना काही स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित करायचे आहे. मात्र डेली मेलच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट या अ‍ॅड्रियन हिल यांच्याशी सहमत नाही आहेत. वाचा- तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या आकडेवारीनं मोडला रेकॉर्ड, 24 तासातील धक्कादायक आकडेवारी जर वैज्ञानिक स्वयंसेवकांना कोरोनाला संक्रमित करतील तर, लसीच्या चाचणीचे निकाल लवकर येऊ शकतात. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा दोन्ही शास्त्रज्ञ सहमत असतील आणि चाचणीच्या प्रस्तावाला एनएचएसच्या अेथिक्सकडून मान्यता मिळेल. दोन्ही शास्त्रज्ञांनी अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात