राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पोलीस निरीक्षकाला भोवले, पाहा हा VIDEO

राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पोलीस निरीक्षकाला भोवले, पाहा हा VIDEO

रॅलीत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Share this:

नांदेड, 18 फेब्रुवारी :  राम मंदिर निधी संकलनाच्या (ram mandir donation) रॅलीत डान्स करणे एका पोलीस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. रॅली नाचल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं ही घटना घडली. 14 फेब्रुवारी रोजी हदगावमध्ये राम मंदिर निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली होती. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.

रॅलीत सहभागी होऊन त्यांनी डान्स केला. आता पोलीस निरीक्षकच डान्स करायला लागले म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले. रॅलीत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

IPL Auction 2021: CSK मॅनेजमेंटनं सांगितली मोठी बातमी, टीमच्या परंपरेला ब्रेक!

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर  याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यानंतर  हनुमंत गायकवाड  यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती त्यांची बदली करण्यात आली. हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.  आता त्यांचा जागी लक्ष्मण राख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Published by: sachin Salve
First published: February 18, 2021, 2:46 PM IST

ताज्या बातम्या