जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2021: CSK मॅनेजमेंटनं सांगितली मोठी बातमी, टीमच्या आजवरच्या परंपरेला यंदा ब्रेक!

IPL Auction 2021: CSK मॅनेजमेंटनं सांगितली मोठी बातमी, टीमच्या आजवरच्या परंपरेला यंदा ब्रेक!

IPL Auction 2021: CSK मॅनेजमेंटनं सांगितली मोठी बातमी, टीमच्या आजवरच्या परंपरेला यंदा ब्रेक!

यंदाचा लिलाव चेन्नईतच होत असल्यानं चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्यामध्ये सहभागी होईल असा सर्वांचा अंदाज होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सिझनसाठी (IPL 2020) खेळाडूंचा लिलाव चेन्नईत होणार आहे. या लिलावासाठी एकूण 292 खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. या लिलावासाठी सर्व फ्रँचायझींनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केला आहे. वेगवेगळ्या टीमचे फ्रँचायझी मालक, मुख्य प्रशिक्षक हे लिलावासाठी चेन्नईत दाखल (News 18 lokmat Live IPL auction Updates) झाले आहेत. यंदाचा लिलाव चेन्नईतच होत असल्यानं चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्यामध्ये सहभागी होईल असा सर्वांचा अंदाज होता. धोनीनं मागच्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. धोनीच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या लिलावाच्या वेळी धोनीला पाहता येईल अशी त्याच्या फॅन्सना अपेक्षा होती. मात्र त्यांची निराशा होणार आहे. महेंद्रसिंह धोनी या लिलावाच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचं टीमचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. धोनीसह टीमचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) देखील यंदा लिलावाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या मर्यांदामुळे फ्लेमिंग यंदा लिलावात सहभागी होणार नाहीत. (हे वाचा : IPL Auction 2021 : ‘या’ खेळाडूला घेतलं तर फायदा होईल, गंभीरनं दिला धोनीला सल्ला!  ) आजवरच्या सर्व लिलावात फ्लेमिंग प्रत्यक्ष उपस्थित होते. ती परंपरा यंदा ब्रेक झाली आहे. धोनी आणि फ्लेमिंग प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी ते लिलावात सहभागी झालेल्या टीमच्या सतत संपर्कात असतील, असं विश्वनाथ यांनी स्पष्ट केले आहे. चेन्नईनं या लिलावापूर्वी केदार जाधव, हरभजन सिंग, पियुष चावला या प्रमुख खेळाडूंना रिलीज केलं आहे. तर शेन वॉटसननं निवृत्ती घेतली आहे. या टीममधील सहा भारतीय आणि एक विदेशी अशा सात जागा शिल्लक आहे. एकमेव विदेशी जागेसाठी धोनीनं मोईन अलीची निवड करावी असा सल्ला गौतम गंभीरनं यापूर्वीच दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात