जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लॉकडाऊनमध्ये नागपुरात हातभट्टीवर फिल्मी स्टाईल रेड, लाखोंचा माल केला नष्ट

लॉकडाऊनमध्ये नागपुरात हातभट्टीवर फिल्मी स्टाईल रेड, लाखोंचा माल केला नष्ट

लॉकडाऊनमध्ये नागपुरात हातभट्टीवर फिल्मी स्टाईल रेड, लाखोंचा माल केला नष्ट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागपूर शहरात लॉकडाऊनचे नियम अक्षरश: ढाब्यावर ठेवले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 4 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागपूर शहरात लॉकडाऊनचे नियम अक्षरश: ढाब्यावर ठेवले आहेत. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने संयुक्त मोहीम राबवून भिमसेनखोरी येथे हातभट्टीवर फिल्मी स्टाईल रेड टाकण्यात आली. पोलिसांनी दारू निर्मिती केंद्रावरील सडवा व इतर साहित्य असा 32 लाख 50 हजार 700 किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. हेही वाचा… कोरोनाच्या भीतीमुळे दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही मोहीम आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कांतीलाल उमाप यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दारू दुकाने बंद असल्याने हातभट्टी दारूचे व अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचारी व मजूर यांना हँडग्लोज, मास व हँड सॅनिटायझर पुरवण्यात आले होते. याबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अकार्यकरी असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच भरारी पथकाचा सर्वच स्टाफ यांना दुचाकीवरून रेडच्या ठिकाणी पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भिवसेन खोरीतील सगळ्या वेगवेगळ्या रस्त्यांनी एकाच वेळी आत जाऊन दारू निर्मितीचे साहित्य मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आले. हेही वाचा…  संचारबंदीत भाजपच्या माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर काठ्यांचा प्रसाद या कारवाईत साधरणपणे राज्य उत्पादन विभागाचे 45 अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या सर्व मोहिमेचे चित्रीकरण करण्यात आले असून पुढील तपास निरीक्षक रावसाहेब कोरे करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात