मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सुंदर पिचईंचं गली क्रिकेट, गुगलीवर Google च्या सीईओंची बॅटिंग!

सुंदर पिचईंचं गली क्रिकेट, गुगलीवर Google च्या सीईओंची बॅटिंग!

क्रिकेटचा खेळ जगभरात लोकप्रिय आहे, पण भारतात या खेळासाठीचं वेड वेगळंच आहे. असा एकही भारतीय नसेल ज्याने लहानपणी क्रिकेट (Cricket) खेळलं नसेल. गुगलचे सीईओ सुंदर पिचई (Google CEO Sundar Pichai) हेदेखील यातलेच एक.

मुंबई, 14 जुलै : क्रिकेटचा खेळ जगभरात लोकप्रिय आहे, पण भारतात या खेळासाठीचं वेड वेगळंच आहे. असा एकही भारतीय नसेल ज्याने लहानपणी क्रिकेट (Cricket) खेळलं नसेल. गुगलचे सीईओ सुंदर पिचई (Google CEO Sundar Pichai) हेदेखील यातलेच एक. साता समुद्रापार सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या पिचई यांच्यातलं क्रिकेटचं प्रेम अजूनही जिवंत आहे. अनेकवेळा त्यांनी आपलं क्रिकेटबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच सुंदर पिचई देखील क्रिकेट खेळण्याची एकही संधी सोडत नाहीत. सुंदर पिचई यांनी नुकताच क्रिकेट खेळतानाचा आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये पिचई बॅटिंग करताना दिसत आहेत. पिचई यांचा हा फोटो बीबीसीला दिलेल्या मुलाखतीनंतरचा आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी बीबीसीच्या अमोल राजन यांच्याशी क्वांटम कॉम्प्युटिग, भारतात घालवलेलं लहानपण यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

गुगल मुख्यालयात पिचई क्रिकेट खेळत होते. या मुलाखतीनंतर दोघांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला. स्टम्प्स नसल्यामुळे एका बॉक्सलाच स्टम्प करण्यात आलं. 'क्वांटम कम्प्युटिंगसह स्थिरतेपर्यंत अनेक मुद्द्यांवर बीबीसीच्या अमोल राजनसोबत चर्चा झाली. सोबत बॅट आणल्याबद्दल अमोलला धन्यवाद. क्रिकेट खेळण्याची संधी कायमच आवडते,' असं पिचई त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून क्रिकेट खेळल्याबद्दल चाहत्यांनीही पिचईंचं कौतुक केलं.

सुंदर पिचई यांनी आयआयटीमधून बिटेक केलं. त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला. अमेरिकेत जाण्याआधी त्यांनी आयआयटी खडकपूरमधून त्यांनी बिटेकची डिग्री मिळवली. स्टेनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मटेरियल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी व्हार्टन स्कूलमध्ये एमबीए केलं. 2004 साली ते गुगलमध्ये आले. सुरुवातीला गुगल सर्च बार वर छोट्या टीमसोबत ते होते. यानंतर ते गुगल क्रोम, क्रोम ओएस याशिवाय अनेक प्रॉडक्टमध्ये काम केलं. जीमेल, गुगल मॅप्स यांच्यासारख्या अनेक सुविधा विकसित करण्यासाठी पिचई यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

First published:

Tags: Cricket, Google, Sundar Pichai