• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • सुवर्णसंधी! बुलढाणा डाक विभागात 'या' पदासाठी जागा रिक्त; आता लगेचच पाठवा अर्ज

सुवर्णसंधी! बुलढाणा डाक विभागात 'या' पदासाठी जागा रिक्त; आता लगेचच पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे.

 • Share this:
  बुलढाणा, 14 जुलै: डाक विभाग बुलढाणा (Department Of Posts Buldhana Recruitment 2021) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, एजन्ट (Agent) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती एजन्ट  (Agent) शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा - UPSC मध्ये यश मिळवायचंय? पाच वर्षं अपयश सोसलेल्या अभिजित यादवचे अनुभव वाचाच अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक, पोस्ट कार्यालये, बुलढाणा विभाग, बुलढाणा. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  31 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: