• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • रिक्षात बसवून प्रवाशांना लुटतायत टोळ्या, पोलिसांसमोर नव्या ‘ऑटो गँग’चं आव्हान

रिक्षात बसवून प्रवाशांना लुटतायत टोळ्या, पोलिसांसमोर नव्या ‘ऑटो गँग’चं आव्हान

एक रिक्षाचालक (Auto Driver) आणि प्रवासी (Passenger) असल्याचा बहाणा करून रिक्षात बसणारे साथीदार प्रवाशांना लुटत (Loot) असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

  • Share this:
नांदेड, 18 जुलै : एक रिक्षाचालक (Auto Driver) आणि प्रवासी (Passenger) असल्याचा बहाणा करून रिक्षात बसणारे साथीदार प्रवाशांना लुटत (Loot) असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नांदेड (Nanded) शहरात वाढलेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर (Police) एक नवे आव्हान उभे राहिले आहे. रिक्षात (Auto Rickshaw) दोन प्रवाशांनी अगोदरच बसायचे आणि तिसऱ्या प्रवाशाची वाट पाहायची. तिसरा प्रवासी रिक्षात बसला की प्रवासादरम्यान त्याच्या खिशातील पाकिट, मोबाईल, चेन, दागिने वगैरे चोरायचे आणि रिक्षाचालकाला रिक्षा थांबवायला सांगून उतरून निघून जायचे, असे प्रकार अनेक ठिकाणी सुरु असल्याचं लक्षात आलं आहे. असा झाला उलगडा कंधारमधील रहिवासी दीपक लुंगारे हे काही कामानिमित्त नांदेडला आले होते. ते रिक्षात बसून इच्छित ठिकाणी गेले. रिक्षातून उतरून रिक्षावाल्याला पैसे देत असताना आपला मोबाईल हरवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. रिक्षात बसलेले दोन सहप्रवासी काही अंतर अगोदरच उतरले होते. लुंगारे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी थेट वजीराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्या रिक्षाचालकाला गाठले. सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिक्षाचालकाने पोलिसी खाक्या दाखवताच तोंड उघडले आणि प्रवाशांची लुटमार करणाऱ्या ‘ऑटो गँग’ची कल्पना दिली. त्यावरून वजीराबाद पोलिसांनी महमद शाहरुख महमद सलाऊद्दीन, सय्यद आरिफ सय्यद  अली आणि शेख मोमीन शेख मदार या चौघांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी नऊ मोबाईल जप्त केले. हे वाचा -''राज ठाकरे हा आश्वासक चेहरा, पण...'', चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य अनेक टोळ्या कार्यरत लुंगारे यांच्या सतर्कतेमुळे अशी एक घटना उघडकीला आली. मात्र नांदेड परिसरात अशा अनेक गँग सक्रिय असून अनेक प्रवाशांची लूट होण्याचे प्रकार वाढत आहेत. महिलांच्याही गळ्यातील दागिने चोरून चोर पोबारा करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिसांनी अशा गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
Published by:sachin Salve
First published: