Home /News /maharashtra /

लडाखमध्ये आणखी एक भारतीय जवान शहीद, जालना जिल्ह्यात पसरली शोककळा

लडाखमध्ये आणखी एक भारतीय जवान शहीद, जालना जिल्ह्यात पसरली शोककळा

भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावपूर्ण स्थिती असतान आखणी एक भारतीय जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे.

जालना, 15 जुलै: भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावपूर्ण स्थिती असतान आखणी एक भारतीय जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे. सतीश पेहरे असं शहीद जवानाचं नाव असून ते जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील रहिवासी आहे. ही बातमी जालना जिल्ह्यात धडकताच संपूर्ण पंचक्रोषीत शोककळा पसरली आहे. लडाख सीमेवर असलेल्या नदीवरील पुलाचं काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सतीश पेहरे यांना वीरमरण आलं. सतीश पेहरे यांचे बंधु देखील लष्कारात कार्यरत आहेत. शहीद सतीश यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. हेही वाचा...COVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मृत्यू दर घसरल्याने दिलासा मिळालेली माहिती अशी की, भारत-चीन सीमेवर असलेल्या लदाख येथे पुलावंगे येथील नदीच्या पुलाचं काम  होतं. तेव्हा एक भीषण अपघातात झाला. त्यात जालना जिल्ह्यातील जाफराबाद वरुड बुद्रुक येथील सतीश सुरेश पेरे (वय-28) हा जवान शहीद झाला. सतीश पेरे हे मूळचे चिखली (जि.बुलडाणा) येथील रहिवाशी होते. त्यांचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून वरूड बुद्रूक शिवारात शेती व्यवसाय करण्यासाठी शेत वस्तीवर वास्तव्यास आहे. बारावी पूर्ण केल्यावर सतीश पेरे हे 2014 मध्ये लष्करात भरती झाले होते. सध्या ते लडाख येथे कर्तव्य बजावत होते. जून महिन्यामध्ये सुटीवर असताना वरूड येथे आलेले पेरे हे 15 दिवसांपूर्वीच पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले होते.  लडाखपासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या शोक नदीवर इंजिनिअरींग बटालीयनकडून पुलाचे (ब्रिजचं) काम सुरु होते. मंगळवारी रात्री पेरे येथे कर्तव्यावर असताना अपघातात सतीश यांचा मृत्यू झाला. हेही वाचा.. शेतात गेलेल्या मायलेकी घरी परतल्याच नाही, नाल्यात सापडल्या अशा अवस्थेत शुक्रवारी मूळगावी येणार पार्थिव.. शहीद जवान सतीश पेहरे यांचं पार्थिव लडाख येथून विमानानं औरंगाबाद येथे गुरूवारी रात्री आणले जाईल. यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर वरूड बुद्रुक येथे शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या