मुंबई, 08 जून : पंतप्रधान नरेंद मोदी (pm narendra modi) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान ते या तीन महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. याचबरोबर राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे आणि महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असल्यााने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. (PM Modi in Maharashtra)
पीएम मोदी 14 जूनला राज्यात येणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान देहूत मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. (pm narendra modi will be come in dehu on 14 june for inauguration of sant tukaram temple) पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यापूर्वी पीएम मोदी मार्च महिन्यात पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते.
हे ही वाचा : MH BOARD 12TH RESULT: 12वीचा वेगवान आणि थेट निकाल फक्त News18lokmat.com वर; ही घ्या लिंक
पुण्यातील कार्यक्रम आटोपून ते मुंबईसाठी रवाना होणर आहेत. सायंकाळी 4.15 वाजता राजभवन मुंबई येथे जय भूषण बिल्डिंग अँड गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन करतील. यानंतर संध्याकाळी 6 वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दी सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम वांद्रे कुर्ला संकुलात होणार आहे.
भाजपचे तुषार भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांची भेट घेतली होती. भोसले यांनी पीएम मोदींना आमंत्रण दिलं होतं. यावेळेस त्यांच्यासोबत देहू संस्थानाचे विश्वस्त उपस्थित होते. भोसले यांच्या विनंतीला मान देत पीएम मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत.
हे ही वाचा : MH BOARD 12TH RESULT: राज्याच्या एकूण निकाल 94.22%; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये
तुषार भोसले यांनी ट्वीट करत दिली माहिती
“महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. 14 जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण! ॥ जय जय रामकृष्णहरि ॥ “, असे ट्विट आचार्य तुषार भोसले यांनी केले.