Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: 12वीचा वेगवान आणि थेट निकाल फक्त News18lokmat.com वर; ही घ्या लिंक

MH BOARD 12TH RESULT: 12वीचा वेगवान आणि थेट निकाल फक्त News18lokmat.com वर; ही घ्या लिंक

Maharashtra 12th Board Result: विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही हा निकाल News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे.

    मुंबई, 08 जून: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (12th Board Result date announced MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता स्टेट बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत.
    आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Today) आहे.आज म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. अखेर आला निकालाचा दिवस; कुठे, कधी आणि कसा बघाल? जाणून घ्या एका क्लिक वर बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही हा निकाल News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ हा लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल.
    कुठे बघता येईल निकाल महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 2021 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 12वीचे निकाल 2020 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी, 12वी 2021 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

    पुढील बातम्या