Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: राज्याच्या एकूण निकाल 94.22%; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये

MH BOARD 12TH RESULT: राज्याच्या एकूण निकाल 94.22%; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये

Maharashtra 12th Result 2022: महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल इतके टक्के लागला आहे.

  मुंबई, 08 जून: बहुप्रतीक्षित महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2022) अखेर घोषित करण्यात आला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) आज 08 जूनला जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
  महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे. एकूण निकाल (HSC Result 2022 Maharashtra Pass Percentage state board) 2020 च्या तुलनेत सुमारे पाच टक्य्यांनी वाढला निकाल. एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकालन लागला आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे. राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई  या विभागाचा लागला आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा ही संपूर्ण राज्यभरातील एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी विभागनिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे होती : 12th विज्ञान - 6 लाख 32 हजार 994 आर्टस् - 4 लाख 37 हजार 336 कॉमर्स - 3 लाख 64 हजार 362 व्यावसायिक अभ्यासक्रम - 50 202
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

  पुढील बातम्या