जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी, 'माझा विनायक मेटे करण्याचा डाव', माजी मुख्यमंत्र्यावर कोण ठेवतंय पाळत?

मोठी बातमी, 'माझा विनायक मेटे करण्याचा डाव', माजी मुख्यमंत्र्यावर कोण ठेवतंय पाळत?

आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

  • -MIN READ Nanded,Maharashtra
  • Last Updated :

**नांदेड, 21 फेब्रुवारी :**काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यानंतर आता ‘माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कारेगांव येथे महाविकास आघाडी तर्फे आयोजित कृतज्ञा सोहळा पार पडला. यावेळी अशोक चव्हाण यांनी मोठा खुलासा केला. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या प्रकारावर खुलासा करत अशोक चव्हाण म्हणाले की,माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केला. ( ‘…तेव्हा राष्ट्रवादीच आमच्याकडे आली होती’, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा खुलासा ) ‘मी खोटं बोलून नेतृत्व करत नाही. आम्ही तुमचं नावं घेत नाही. आम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्या बहिणीला जाऊन सांगा काय बोललं पाहिजे, काय बोललं नाही पाहिजे, असं सांगत अशोक चव्हाण यांनी नांदेड मधील भाजपाच्या स्थानिक नेत्यावर अंगुलीनिर्देश केला. त्यांनी नाव कोणाचं घेतले नाही. पण त्यांचा रोख भाजपा खासदराककडे असल्याची चर्चा सुरू आहे. सहा महिन्यात या नवीन सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केलं? ‘सत्ता बदलानंतर या नवrन सरकारने मराठा आरक्षणासाठी एक पाऊल तरी उचलल का असा सवाल माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. (‘मराठा आरक्षणासंदर्भात..’ अशोक चव्हाणांच्या लेटरहेडचा गैरवापर; घातपाताचाही संशय, पोलिसात तक्रार) ‘आमच्या काळात अडीच वर्षात मोर्चे, आंदोलने झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन सरकारने भूमिका मांडली. पण गेल्या सहा महिन्यात एक तरी सकारात्मक पाऊल तूम्ही टाकलं का. आज ही सर्वोच न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावर या सरकारने काहीच केलं नाही. सत्ता आली आणि हे शांत बसले . मराठा आरक्षण फक्त राजकारणासाठी होत का असा सवाल चव्हाण यांनी विचारला. स्वच्छ मनाचा आणि मदत करणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘स्वच्छ मनाचा, मदत करणारा , सकारात्मक काम करणारा मुख्यमंत्री म्हणून मी उद्धव ठाकरे यांना मी पाहिले, असा उल्लेख करत अशोक चव्हाण यांनी उद्धाव ठाकरे यांचे कौतुक केलं., सत्ता आली तेव्हा त्यांना प्रशासनाचा अनुभव नव्हता तरीही त्यांनी कोणतेही काम थांबवल नाही. विशेष करुन मराठवाड्याचे विषय त्यांनी थांबवले नाहीत, असंही चव्हाण म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात