Home /News /national /

जम्मू आणि काश्मीर: 6 महिन्यांमध्ये 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांना मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: 6 महिन्यांमध्ये 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांना मोठं यश

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

सुरक्षा दलांनी आणखी 125 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली असून त्यात त्यात 25 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे.

    श्रीनगर 8 जून: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यावर्षात मोठं यश मिळालं आहे. जानेवारी ते  8 जून  या सहा महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर सुरक्षा दलांनी आणखी 125 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली असून त्यात त्यात 25 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे अशी माहिती लष्कराच्या 15व्या कोअर कमांडचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली. तर दहशतवाद्यांशी लढताना 29 जवान आणि अधिकारी शहीद झाले अशी माहितीही त्यांनी दिली. आज सकाळी शोपियांतल्या पिंजौरा इथं सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन असताना अनेक चकमकी झाल्या होत्या. सुरक्षा दलांवर अनेक हल्लेही झाले होते. तर अनेक मोठे कट सुरक्षा दलांनी उधळून लावले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये  हिजबुल आणि तोयबा सारख्या अनेक कडव्या दहशतवादी संघटनांचे कमांडर्स असल्याने या संघटनांना मोठा धक्का बसला होता. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सीमेपलिकडचे अतिरेक्यांचे लाँचिंग पॅड्स पुन्हा सक्रिय करत आहेत. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाची त्यावर नजर असून त्याची माहिती लष्कराला दिली जात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता निर्माण होत असल्याने ती भंग करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत असून दहशतवादी संघटनांना फूस लावत आहेत. सुरक्षा दलांच्या आक्रमक कारवाईमुळे दहशतवादी संघटनाही बिथरल्या असून सुरक्षा दलांवर हल्ल्याची योजना बनवत असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलं सावध झाली आहेत. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये दहशतवाद्यांविरुद्धची धडक कारवाई आणखी तीव्र करू असा इशाराही लष्कराने दिला आहे. हे वाचा -  भारतात तयार होणार कोरोनावरचं हे औषध, 5 कंपन्यांना पाहिजे उत्पादनाची परवानगी परीक्षा न देताच 10वीची सर्व मुलं पास  होणार, या राज्याने घेतला मोठा निर्णय संपादन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या