मुंबई, कोकणासह राज्यात हवामान खात्याकडून Good News, या तारखेला होणार मुसळधार पाऊस

मुंबई, कोकणासह राज्यात हवामान खात्याकडून Good News, या तारखेला होणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जून : देशात दक्षिण-पश्चिम मान्सून मोठ्या वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे आतापर्यंत मान्सूनचा पाऊस दक्षिण भारतातील अनेक राज्यांच्या किनारपट्टी भागात दिसून आला. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे दक्षिण-पश्चिम मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामानात असाच बदल राहिला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह देशातील बर्‍याच भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, येत्या दोन दिवसांत मॉन्सून बंगालच्या उपसागरासह, ईशान्येकडील राज्यं, सिक्कीम, ओडिशाचा काही भाग आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये पुढच्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळनंतर गेल्या दोन दिवसांत मान्सूनने दक्षिणेकडे कर्नाटक, तामिळनाडूचा बहुतेक भाग, रायलसीमा आणि दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये तडाखा दिला. ईशान्य भारतात, मान्सून पुढील दोन-तीन दिवसांत चांगलाच बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील उर्वरित भागात पुढे जाईल. तर मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71 टक्के जास्त झाला आहे. यात मध्य भारत आणि केरळ यांचं सर्वाधिक योगदान आहे.

मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून

10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रावरील दक्षिण-पश्चिमी वारा सक्रिय झाल्यामुळे, मान्सून कर्नाटक व रायलसीमाच्या काही भागात पाऊस पडून तो पुढे तेलंगणात पोहोचेल. तसंच मुंबईसह महाराष्ट्राच्या कोकण भागात, मध्य महाराष्ट्रातही लवकरच पावसाळ्याच्या आगमनाची चांगली बातमी येईल. येत्या काही दिवसांत मान्सूनची प्रगती होत असल्यानं ओडिशा, गंगा पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रासाठी यंदा मान्सून चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे.

गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ

येत्या 24 तासात पावसाची शक्यता, दिल्लीमध्ये वाढेल उष्णता

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, ओडिशाचा दक्षिणेकडील भाग, आंध्र प्रदेश, केरळ, किनारी कर्नाटक, कोकण आणि गोवा, गुजरातचा दक्षिणेकडील भाग आणि तामिळनाडूच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

टोळधाड नांगर ओढतेय तर मासळी बिअर पितेय, हा VIRAL VIDEO पाहिलात तर पोट धरून हसाल

संपादन - रेणुका धायबर

First published: June 9, 2020, 7:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading