जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'काळं सोनं' लुटले पण पळून जाताना व्हॅन कोसळली कॅनॉलच्या खड्यात, तिघे जागीच ठार

'काळं सोनं' लुटले पण पळून जाताना व्हॅन कोसळली कॅनॉलच्या खड्यात, तिघे जागीच ठार

'काळं सोनं' लुटले पण पळून जाताना व्हॅन कोसळली कॅनॉलच्या खड्यात, तिघे जागीच ठार

प्रवरा आणि मुळा नदीतून सध्या राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे. वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

संगमनेर, 28 जून : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सध्या राजरोसपणे काळे सोने समजल्या जाणाऱ्या  वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. अशातच आज पहाटे वाळूची गाडी खोल खड्ड्यात पडून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात ही घटना घडली आहे. तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदीतून सध्या राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे. वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे टाटा पिकअप 207 या मधून चोरटी वाळू वाहतूक करत असताना कॅनॉलच्या खड्डयांमध्ये पिकअप पलटी झाली. शेतकरी बापाला असा सलाम कुणीच केला नसेल, लेकानं मिळावलेल्या यशाचं होतंय कौतुक या घटनेत दोन मजूर आणि गाडीचालक असे तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तिघांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले तर एक जणाला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच तालुक्यात वाळू तस्करांचा सुरू असलेला उच्छाद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. एकीकडे तालुक्यात वाढत चाललेली कोरोना बाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कामाला लागलेले असताना  आता वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. या अवैध वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात