बाराबंकी, 28 जून : आई-वडील शेतकरी आणि शिक्षणाचं वातावरण घरात नसतानाही परीक्षेत अव्वल यश मिळवणाऱ्या अभिमन्यू वर्माचं देशभरात कौतुक होत आहे. उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये दहावीच्या परीक्षेत अभिमन्यू वर्माने 95.83 टक्के मिळवले आहेत. काही मार्कांसाठी अभिमन्यूचा पहिला क्रमांक हुकला मात्र मिळालेल्या यशानं अभिमन्यूचे शिक्षक आणि वर्मा कुटुंबीय खूप खूश आहेत. अभिमन्यूनं केवळ वर्मा कुटुंबीयांचंच नाही तर गावाचं नावही रोशन केलं. बाराबंकी इथल्या साई इण्टर कॉलेज आणि महाविद्यालयतील दहावीचा विद्यार्थी अभिमन्यूनं शाळेची मान आणि शान आणखीन उंच केली आहे. अभिमन्यू शेतकरी कुटुंबातून आलेला. घरात फारसं शिक्षण नाही पण तरीही मुलानं शिकून खूप मोठं व्हावं असं आई-वडिलांचं स्वप्न आहे. या स्वप्नांना सत्यात उतरवत पहिली यशाची पायरी मुलानं पार केल्याचा आनंद आहे. हे वाचा- वडील चालवायचे इलेक्ट्रीकचं दुकानं 16 तास अभ्यास करून मुलानं केलं बोर्डात टॉप अभिमन्यूने सांगितले की तो दररोज 5 ते 6 तास अभ्यास करत असे आणि त्याच्या यशात शिक्षक आणि मार्गदर्शन कऱणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात डॉक्टर बनून देशासाठी काम करायचे आहे. मिळालेल्या यशाबद्दल खूप आनंदी आहे पण ध्येय मोठे आहे, असं अभिमन्यूनं सांगितलं. संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.