Home /News /maharashtra /

जमावबंदी कायद्याची ऐसी तैसी! परळीत भाजप आमदारासह 22 जणांवर गुन्हा दाखल

जमावबंदी कायद्याची ऐसी तैसी! परळीत भाजप आमदारासह 22 जणांवर गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं वृत्त 'न्यूज 18 लोकमत'ने सगळ्यात आधी प्रसिध्द केलं होतं. वृत्त झळकताच पोलिसांनी जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
बीड, 22 मे: भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांविरुद्ध परळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा ठपका आमदार रमेश कराड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सोशल डिस्टन्सिंग आणि संचार बंदीचे नियम पाळा, असं राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानं आवाहन केलं आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं वृत्त 'न्यूज 18 लोकमत'ने सगळ्यात आधी प्रसिध्द केलं होतं. वृत्त झळकताच पोलिसांनी जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा...मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर शिवसेना मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा काय आहे प्रकरण? आमदार रमेश कराड यांनी गुरुवारी (21 मे) सकाळी 11.30 च्या सुमारास परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार रमेश कराड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केलं. यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. याप्रकरणी आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे येत असल्याची पोलिस प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना दिली नव्हती. ते अचानकपणे गोपीनाथ गडावर दर्शनासाठी आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, आणि शेकडो कार्यकर्ते होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी जीवितास धोका आहे. तसेच सोशल डिस्टसिंग न पाळल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदी आदेशाचे व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 143, 188, 269, 270, 271, भादवीसह कलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे आमदार रमेश कराड यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हेही वाचा.. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह, सांगली जिल्हा हादरला आमदारांच्याच चेहऱ्यावर नव्हता मास्क.. गोपीनाथ गडावर आलेले भाजपचे आमदार रमेश कराड यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून कोरोनाबद्दल कोणतीही काळजी यावेळी घेण्यात आली नाही. आमदार कराड यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना आमदार कराड यांच्या भोवती गराडा घातला होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम कोणासाठी हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या