कर्जत 08 ऑक्टोंबर : महाराष्ट्रातल्या ज्या मोजक्या विधानसभा लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात कर्जत-जामखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असून भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. राष्ट्रवादीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रोहित यांचं राजकारणात लॉचिंग केलं असून सर्व शक्ती पणाला लावलीय. त्यांच्या प्रचाराला पार्थ पवार येणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी थेटपणे उत्तर देत सर्व अफवा फेटाळून लावल्या. रोहित पवार म्हणाले, अजित पवारांची एक सभा झाली आणि आणखी काही सभा होणार आहे. शरद पवारांच्याही सभा होणार आहेत. पार्थ पवारही प्रचाराला येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पार्थ सध्या बारामती आणि पिंपरी चिंचवडमध्ये अडकलाय. तो तिकडे प्रचार करतोय. पण नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्ये तो या भागातही प्रचाराला येणार आहे. तुझ्या बापाला तुरुंगातच घालणार, प्रणिती शिंदेंना माजी आमदाराची धमकी लोक उगाच अफवा पसरविण्याचं काम करताहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं. रोहित पवार पुढे म्हणाले, आमचं सर्व कुटुंब एकत्र आहे. कुटुंब कलह वगैरे काहीही नाही. हा शब्दही आम्हाला माहित नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. मला राजकारणाचा जास्त अनुभव नसला तरी समाजकारण जास्त केलंय अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. रोहित यांना राजकारणाचा अनुभव नाही अशी टीका भाजपकडून करण्यात येत होती. मी या भागात बाहेरचा उमेदवार नाही तर इथं गेली अनेक वर्षांपासून काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रवादी’ एकत्र येतील, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेताचा दावा लोकसभा निवडणुकीच्या काळात पार्थ यांच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा झाली होती. रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यात मतभेद आहे असंही बोललं जात होतं. मात्र या सर्व गोष्टी या जाणीवपूर्वक पसरविण्यात आल्याचं मत रोहित यांनी अनेकदा व्यक्त केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







