'काँग्रेस' आणि 'राष्ट्रवादी' एकत्र येतील, काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ नेत्याचा दावा!

'काँग्रेस' आणि 'राष्ट्रवादी' एकत्र येतील, काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ नेत्याचा दावा!

'आता राष्ट्रवादीवाले थकलेत आणि काँग्रेसवालेही थकलेत. एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत त्यामुळे एकत्र येण्यास अडचण नाही.'

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर 08 ऑक्टोंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाच्या बातम्या कायम येत असतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर दोनही पक्ष मोठ्या अडचणीतून जात आहेत. पक्षाचं अस्तित्व टिकवण आणि वाढवणं हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. अशा पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंजे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  विलिनीकरणाबद्दल मोठं वक्तव्य दिलंय. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येवू शकतात. आमच्या दोघांचीही विचारसरणी एकच आहे त्यामुळे एकत्र येण्यास अडचण येणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येवू शकतात. आता तेही थकलेत, आम्हीही म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस देखील थकली आहे.

निवडणुकीआधीच 'या' 5 मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी अडचण, कार्यकर्ते गोंधळात

एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे त्यांच्याही (पवारांच्या) मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बोलून दाखवतील. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय.

मला अटक करूनच दाखवा - शरद पवारांचं आव्हान

सरकारने मागील 5 वर्षात सर्वसामान्य माणसाचे हित जपले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. भाजपा आणि सेनेला शेतीतले काही कळत नाही. कांद्याची वाईट अवस्था आहे. सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना सरकारने निर्यात बंदी केली हे सरकारचे शेतकाऱ्यांवरील प्रेम,' असा टोला लगावत शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केलं.

EXCLUSIVE : जे चाललं ते योग्य नाही, शरद पवारांची UNCUT मुलाखत

'हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत आहे. पण आम्ही कशाला घाबरत नाही. गुन्हे दाखल करा नाहीतर अटक करा, पण शेतकरी, कामगार, युवक यांच्या प्रश्नांवर आपण बोलत राहू,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला आव्हान दिलं. निवडणुकीच्या निमित्ताने या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम जनतेने करावं, असं आवाहनही पवार यांनी अहमदनगर इथं प्रचारसभेत बोलताना केलं.

SPECIAL REPORT : भाजपला पाडण्यासाठी राष्ट्रवादी- मनसेचा 'गनिमी कावा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. विधानसभा प्रचारासाठी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी आज पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 8, 2019, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading