तुझ्या बापाला तुरुंगातच घालणार, प्रणिती शिंदेंना माजी आमदाराची धमकी

जो पंतप्रधानाला सोलापूरात आणू शकतो तो कोणालाही जेलमध्ये घालू शकतो. माझ्यावर 170 केसेस आहेत त्या 200 झाल्याशिवाय गप्प बसणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 04:52 PM IST

तुझ्या बापाला तुरुंगातच घालणार, प्रणिती शिंदेंना माजी आमदाराची धमकी

सागर सुरवसे, सोलापूर 08 ऑक्टोंबर : निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते कधी काय आरोप करतील ते काही सांगता येत नाही. ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांचा आज प्रचार सभेत तोल सुटला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना थेट धमकीच दिली. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी प्रणिती शिंदेंना सुनावलं सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आडम मास्तर उभे आहेत. अनेक दशकं विधानसभेत गाजवल्यानंतर आडम मास्तर आता पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. प्रचारसभेत बोलताना नरसय्या आडम म्हणाले, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरात आणू शकतो तो कोणालाही जेलमध्ये घालू शकतो. माझ्यावर 170 केसेस आहेत त्या 200 झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत असंही ते म्हणाले. नरसय्या आडम यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.

वाचा- 'मला अटक केली तरी चालेल, पण...' ; शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

तर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाच्या बातम्या कायम येत असतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर दोनही पक्ष मोठ्या अडचणीतून जात आहेत. पक्षाचं अस्तित्व टिकवण आणि वाढवणं हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. अशा पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंजे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  विलिनीकरणाबद्दल मोठं वक्तव्य दिलंय. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येवू शकतात. आमच्या दोघांचीही विचारसरणी एकच आहे त्यामुळे एकत्र येण्यास अडचण येणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येवू शकतात. आता तेही थकलेत, आम्हीही म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस देखील थकली आहे.

वाचा- निवडणुकीआधीच 'या' 5 मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी अडचण, कार्यकर्ते गोंधळात

Loading...

एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे त्यांच्याही (पवारांच्या) मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बोलून दाखवतील. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...