मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

परभणीत राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा खास आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

परभणीत राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा खास आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

परभणी जिल्ह्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Parbhani, India

परभणी, 26 जानेवारी : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आता परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

परभणी जिल्ह्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्या असून, एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेच आता शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा, खुलासा सईद खान यांच्याकडून करण्यात आला आहे.

(उद्धव ठाकरे जाणार का एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात? ठाण्यात आज हायहोल्टेज ड्रामा)

सईद खान यांच्या या खुलासानंतर परभणीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शरद पवारांचे निकटवर्ती असलेले बाबाजानी यांचे नाव पुढे आल्याने, सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु आपण शरद पवार यांचे समर्थक असून कायम त्यांच्याकडेच राहणार असल्याचा दावा बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.

(पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात? जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ)

शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या या दाव्यानंतर, परभणी जिल्ह्यातील एकूण राजकीय वातावरण तापले आहे. दावे आणि प्रति दावे रोजच्या रोज केले जातात, परंतु यातून नेमकं काय तथ्य बाहेर येत हे येणाऱ्या काळात समजेल.

First published: