मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Breaking news: उजनीच्या पाणी प्रश्नावरून संघर्ष पेटला, पंढरपूर सातारा महामार्गावर टायर जाळत आंदोलन, दोन तास वाहतूक ठप्प

Breaking news: उजनीच्या पाणी प्रश्नावरून संघर्ष पेटला, पंढरपूर सातारा महामार्गावर टायर जाळत आंदोलन, दोन तास वाहतूक ठप्प

Agitation for Ujani water जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी आदेश देत हा निर्णय रद्द केला आहे. मात्र तरीही आंदोलक अध्यादेश येईपर्यंत आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत.

  • Published by:  News18 Desk

पंढरपूर, 24 मे: उजनीच्या पाणी प्रश्नावरून सुरू असलेला संघर्ष पेटल्याचं चित्र (Ujani Water Dispute) पाहायला मिळत आहे. सोमवारी सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत पंढरपूर-सातारा रोडवर निषेध व्यक्त (Agitation for Ujani water) करण्यात आला. याठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवत याठिकाणी टायर जाळत आंदोलन केलं. या आंदोलनामुळं जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र या मार्गावर निर्माण झालं होतं. पाहायला मिळालं होते.

(वाचा-रक्ताची नाती जीवावर उठली, भर वस्तीत कोयता-कुऱ्हाडीने हल्ला, बीडमधील VIDEO)

उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी जाहीर केलं. मात्र मात्र जोपर्यंत तसा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिलाय. त्यानुसार  उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खुपसे, माऊली हाळनवर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन केलं. आंदोलकांनी पंढरपूर-सातारा रस्ता अडवला होता. या मार्गावर टायर जाळत आंदोलकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळं मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. जवळपास दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

(वाचा-Shocking:कोरोनासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्कारात गर्दी)

उजनी धरणातील 5 टीएमसी पाण्यावरून सध्या पुणे विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटला आहे. सोलापूर जिल्ह्यानं इंदापूरला हे पाणी वळवण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. सोलापूरमधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनीदेखिल या निर्णयाला विरोध केला होता. तसंच संघर्ष समितीनं देखील याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केलं.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इंदापूर हा मतदारसंघ आहे. त्यांनी उजनीचं पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप सध्या केला जात आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी आदेश देत हा निर्णय रद्द केला आहे. मात्र तरीही आंदोलक अध्यादेश येईपर्यंत आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत.

First published:

Tags: Pune, Pune solapur, Solapur, Water