मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रक्ताची नाती जीवावर उठली, भर वस्तीत कोयता-कुऱ्हाडीने हल्ला, बीडमधील VIDEO

रक्ताची नाती जीवावर उठली, भर वस्तीत कोयता-कुऱ्हाडीने हल्ला, बीडमधील VIDEO

ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्‍हाडी आणि कोयत्याने हल्ला केला.

ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्‍हाडी आणि कोयत्याने हल्ला केला.

ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्‍हाडी आणि कोयत्याने हल्ला केला.

बीड, 24 मे: जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटात कोयता आणि  कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बीडमधील  (Beed) कामखेडा गावाजवळील पवार तांड्यावर घडली आहे.  या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पवार तांड्यावर भीतीचे वातावरण असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पांडुरंग पवार(32),संतोष विठ्ठल पवार(36)सुनील बंडू पवार(22),निलाबाई अंकुश आढे (45)रमेश पवार (25) अशी जखमींची नावं आहेत. या गंभीर रुग्णावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड तालुक्यातील कामखेडा गावातील पवार तांडयावर रात्री 8 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्‍हाडी आणि कोयत्याने हल्ला केला. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पाच ते सहा जणांना देखील या वेळी जबर मारहाण करण्यात आली.  मात्र अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पवार तांड्यावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

बायकोला ब्लॅक बिकनीमध्ये पाहून हार्दिक पांड्या म्हणाला...

कामखेडा गावातील लमाण तांड्यावरील पवार कुटुंबातील सर्व ऊसतोड मजूर आहेत. हे कुटुंब सहा महिने ऊस तोडणीला पश्चिम महाराष्ट्रात जातात. तसंच जमीन थोडा असल्यामुळे काही जण इतर मोलमजुरीचे काम करतात. यातच जमिनीच्या कारणावरून व भावकीच्या वादातून ही घटना घडली. विशेष म्हणजे, या किरकोळ भांडणात हल्ला करण्यापर्यंत धारदार शस्त्राने कोयता आणि कुऱ्हाडीचा भांडणात सर्रास वापर केल्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करून मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे

cyclone tauktae चक्रीवादळामुळे कोकणात 47 कोटी 15 लाखांचे नुकसान, अहवाल सादर

तर, भावकीच्या वादातून हा प्रकार झाल्याचा प्रथमदर्शी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news