मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Shocking news: कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी लोटली हजारोंची गर्दी, पाहा Video

Shocking news: कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी लोटली हजारोंची गर्दी, पाहा Video

Karnataka Shocking Video कर्नाटकमध्ये रविवारी कोरोनामुळं 626 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 25,979 कोरोना रुग्ण आढळले. एवढी गंभीर परिस्थिती असूनही नागरिक गांभीर्यानं गेत नसल्याचं पाहायला मिळतंय.

  • Published by:  News18 Desk

बंगळुरू, 24 मे: कोरोना व्हायरस (Coronavirus) चा वाढता संसर्ग पाहता देशात सध्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. कुठंही सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दी (Ban on crowd gathering) जमवण्यास परवानगी नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊनही (Lockdown) सुरू आहे. पण तरीही अनेक ठिकाणी लोक बेदरकारपणे वागत कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार कर्नाटकच्या बेळगावमध्ये (Karnataka Belgaum News) पाहायला मिळाला आहे. याठिकाणी एका अंत्यसंस्कारात हजारोंची गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. बरं हा अंत्यसंस्कार एखाद्या नेत्याचा नव्हता तर घोड्याचा होता. (crowd gathered in horse funeral)

(वाचा-VIDEO : आणखी एका जिल्हाधिकाऱ्यांची कायद्याला तिलांजली; दुकानदाराला मारली चापट)

कोरोनाच्या संकटकाळामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी मिळालेली नाही. एवढंच काय पण अंत्यसंस्काराच्या विधीलाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीलाच परवानही दिली जात आहे. मात्र बेळगावमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झालेला हा घोडा एका आश्रमाशी संबंधित होता. त्यामुळं धार्मिक भावनेतून या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं. कोन्नूरच्या जवळ असलेल्या कदासिद्धेश्वर आश्रमातील हा घोडा होता.

समोर आलेल्या माहितीनुसार आश्रमातील या घोड्याची आधी पुजा करण्यात आली होती. त्यानंतर जगातील कोरोना नष्ट व्हावा म्हणून या घोड्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर हा घोडा दोन दिवस गावामध्ये चरत होता. पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ही हजारोंची गर्दी जमा झाली. घोड्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारापूर्वी पावदेश्वर स्वामी यांनी पुजा केली होती. त्यानंतर या घोड्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

(वाचा-टाटांचं मोठं मन! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार)

घोड्याच्या अंत्यसंस्काराचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो मरादीमठ याठिकाणचा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सद्या स्थानिक प्रशासनानं परिसर सील केला आहे. 400 घरं असलेल्या या संपूर्ण वस्तीला सील करण्यात आलं असून काही दिवस या परिसरात येण्यास किंवा येथील कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी नसणार आहे. येथील सर्व रहिवाशांच्या COVID-19, SARI आणि ILI च्या चाचण्या सध्या केल्या जात आहेत.

कर्नाटकमध्ये रविवारी कोरोनामुळं 626 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 25,979 कोरोना रुग्ण आढळले. एवढी गंभीर परिस्थिती असूनही नागरिक गांभीर्यानं गेत नसल्याचं पाहायला मिळतंय.

First published:

Tags: Belgaum, Bengaluru, Coronavirus, Funeral, Karnataka