मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pandharpur Accident : परप्रांतीय मजुरांना रेल्वेनं चिरडलं, 2 जागीच ठार, रुळावर सापडल्या दारूच्या बाटल्या

Pandharpur Accident : परप्रांतीय मजुरांना रेल्वेनं चिरडलं, 2 जागीच ठार, रुळावर सापडल्या दारूच्या बाटल्या

पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर परप्रांतीय मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील मजुरांचा रेल्वे रुळावर अपघातात मृत्यू झाला आहे.

पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर परप्रांतीय मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील मजुरांचा रेल्वे रुळावर अपघातात मृत्यू झाला आहे.

पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर परप्रांतीय मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील मजुरांचा रेल्वे रुळावर अपघातात मृत्यू झाला आहे.

  विरेंद्र उत्पात (पंढरपूर), 03 ऑगस्ट : पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर परप्रांतीय मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील मजुरांचा रेल्वे रुळावर अपघातात मृत्यू झाला आहे. (Pandharpur Accident) यामध्ये दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात भीषण असल्याने अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांचे शरीर धडावेगळे झाले होते. दरम्यान हा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी या घटनेची माहिती समजल्यावर लोकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

  अपघात स्थळी दारुच्या बाटल्या आढळल्या असून मद्य प्राशन केल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काल मध्यरात्री हा अपघात घडल्याने याबाबत सकाळी लवकर याची माहिती समजल्याचे बोलले जात आहे. रात्रीबेरात्री अवैधरीत्या विक्री होणारी दारू आणि दारु पिण्यासाठी रेल्वे रुळावर गेल्यामुळे अपघात घडला असल्याची चर्चा सुरू होती.

  हे ही वाचा : मोठी बातमी, धर्मवीर आनंद दिघेंच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा, ठाकरेंच्या सेनेला धक्का

  सातारा पंढरपूर महामार्गावर जोरदार अपघात, तिघे ठार

  सातारा - पंढरपूर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दुचाकी व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले. तर कारमधील चिमुरडा सुदैवाने बचावला. ही दुर्घटना काल (दि. 02) दुपारी दीडच्या सुमारास घडली. तिन्ही मृत युवक पळशी (ता. माण) येथील आहेत.

  हे ही वाचा : शरद पवार आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी, कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी

  दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक

  याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, (दि. 02) दुपारी दीडच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दुचाकी ( बुलेट) व स्विप्ट (एम. एच. 05 व्ही. 9695) या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत बुलेटवरील तुषार लक्ष्मण खाडे (वय 22), अजित विजयकुमार खाडे (वय 23), तर महेंद्र शंकर गौड (वय 21) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्विप्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे (वय 28) व त्यांच्या बाजुला बसलेले आनंदराव ढेंबरे (वय 61) हे गंभीर जखमी झाले. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pandharpur (City/Town/Village), Pandharpur news, Solapur (City/Town/Village), Solapur news

  पुढील बातम्या