मुंबई, 14 मे : पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात आज एका अपघातामुळे नवा वाद सुरू झाला आहे. पालघरमध्ये स्थानिकांकडून मारल्या गेलेल्या साधूंची बाजू न्यायालयात मांडणारे वकील एका अपघातात मृत्युमुखी पडले. हा अपघाती मृत्यू संशयास्पद असल्याचं आता भाजपकडून म्हटलं जात आहे. या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणीही होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राने ही केस CBI कडे सोपवावी अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने लावून धरली आहे.
पालघरमध्ये हिंदू साधूंचं हत्याकांड झालं, त्या खटल्यात साधूंची बाजू न्यायालयात मांडणारे सहयोगी वकील दिग्विजय त्रिवेदी यांच्या गाडीचा अपघात झाला. ते सुनावणीसाठी कोर्टात जात असतानाच मुंबई- अहमदाबाद महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि ते जागेवरच मृत्युमुखी पडले. हा अपघात हा निव्वळ योगायोग होता का? असा प्रश्न भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यांच्या Twitter पोस्टमधून केला आहे.
भाजपच्या IT सेलच्या प्रमुख प्रीती गांधी यांनीसुद्धा या अपघातात काळंबेरं नसेल कशावरून अशी शंका उपस्थित करणारं ट्वीट केलं आहे. साधूंना न्याय मिळालाच पाहिजे या अर्थाचं #JusticeForHinduSadhus हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.
राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत एका कारला भीषण अपघात झाला. या अपघातात बहुजन विकास आघाडीचे नेते आणि वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा जागेवरच मृत्यू झाला. आणखी एक महिला या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अॅड. दिग्विजय त्रिवेदी हे बहुजन विकास आघाडीच्या मिरा भाईंदर विधी सेलचे जिल्हाध्यक्ष होते. कारने मुंबईहून सुरतकडे जात होते. मेंढवन खिंडीत आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघातात दिग्विजय त्रिवेदी यांचा जागेवरच मृत्यू झाला.
या अपघातावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी व्यक्त केला आहे.
संबित पात्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पालघर प्रकरणात ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला किंवा त्यांच्याविरोधात FIR दाखल केलं आहे. आता हा अपघात केवळ योगायोग मानायचा का?
पालघर में संतो की हत्या मामले में VHP के वकील श्री दिग्विजय त्रिवेदी की सड़क हादसे में मृत्यु हो गयी
यह खबर विचलित करने वाली है
क्या ये केवल संयोग है की जिन लोगों ने पालघर मामले को उठाया उनपर या तो कांग्रेस कार्यकर्ताओं ने हमला किया या FIR कराया?
ख़ैर ये जाँच का विषय है!
ॐ शान्ति pic.twitter.com/GGlMhAYEl4
— Sambit Patra (@sambitswaraj) May 14, 2020
पालघर प्रकरणातलं रहस्य वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने ही केस तातडीने CBI कडे द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
Lawyer appointed by VHP on behalf of the deceased Hindu Sadhus in Palghar - Digvijay Trivedi has been killed in a road accident.
This mystery is only getting deeper. Maharashtra Govt should immediately hand over the case to CBI. They have miserably failed!#JusticeForHinduSadhus pic.twitter.com/Phvv2vT91e
— Priti Gandhi - प्रीति गांधी (@MrsGandhi) May 14, 2020
पालघर जिल्ह्यात गडचिंचले गावात 16 एप्रिलला रात्री दोन साधूंची स्थानिक जमावाने हत्या केली. हे साधू गुजरातमध्ये एका महंतांच्या अंत्यविधीसाठी जात होते. लॉकडाऊनमुळे अहमदाबाद रस्त्यावर नाकाबंदी असल्याने त्यांनी आतल्या गावचा रस्ता धरल्याचं सांगण्यात येतं. गावकऱ्यांनी अपरात्री फिरणारे ते चोर आहेत, असं समजून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण करून, दगडाने ठेचून मारण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र हादरला, मृतांची संख्या गेली 1000च्या पुढे