मुंबई 14 मे: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे. आज राज्यात १६०२ नवे रुग्ण सापडले. तर राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकड्यानं हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णाची एकूण संख्या ही २७५२४ वर गेली आहे. आज राज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या १०१९ वर गेली आहे. मुंबईत आज तब्बल ९९१ रुग्णांनी वाढ झाली. तर आज ५१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबईत आज 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579वर पोहचली आहे. आज कोरोणामुळे 25लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 621 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 443जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4234 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेश नुसार कोविड 19 आजाराच्या तपासणीनंतर नव्या मार्गदर्शक तत्व जरी केली आहेत. राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल आता सर्व गरोदर महिला जांची बाळंतपणाची तारीख 5 दिवसाच्या जवपास आहेत यांची तपासणी करायची आहे. नियमित डायलेसीस करावे लागणाऱ्या रुग्णांना आता दरवेळी टेस्ट करण्याची गरज नाही. अशा रुग्णांना लक्षणं असतील तर मात्र टेस्ट करून घेणे गरजेचे असेल टेस्ट करण्यासाठी सरकारी, महापालिकेचे ,आणि शासनाकडे नमूद असलेल्या खाजगी डॉक्टर यांचं प्रायक्रीप्शन असणे गरजेचे असेल. डॉक्टर ने केवळ लक्षणं असलेल्या लोकांनाच टेस्ट करावयास सांगावे. Social Distancing चं उल्लंघन कराल तर टॉयलेट साफ करावं लागणार विलागिकारान करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाक्या कुटुंबीय आणि जवळच्या संपर्कात आलेल्या लोकांचे 5 किंवा 14 व्या दिवशी एकदा टेस्ट करावे. आणि या दिवसात लक्षणं आढळली नाहीतर त्यांना घरी सोडावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.