मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नंदुरबारने करून दाखवलं, हवेतूनच ऑक्सिजन निर्मितीचा उभारला प्रकल्प!

नंदुरबारने करून दाखवलं, हवेतूनच ऑक्सिजन निर्मितीचा उभारला प्रकल्प!

400 सिलेंडर नंदुरबारमध्येच निर्मिती केली जात आहे.

400 सिलेंडर नंदुरबारमध्येच निर्मिती केली जात आहे.

400 सिलेंडर नंदुरबारमध्येच निर्मिती केली जात आहे.

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदूरबार, 24 एप्रिल :  राज्यात सध्या ऑक्सिजनची (Oxygen) कमतरतेची ओरडा आरड होत आहे. अशातच कोरोनाची (corona) लागण देशात सुरू झाल्यापासून अतिशय तोकड्या आरोग्य यंत्रणा असलेल्या नंदुरबार जिल्ह्याने मात्र आपल्या शासकीय रुग्णालयांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन पैकी जवळपास पन्नास टक्के ऑक्सिजन निर्मीती आपल्या जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पातून पूर्ण केली आहे.

नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या दुरदृष्टीतून सध्या जिल्ह्यात 400 जंबो ऑक्सिजन सिलेंडर भरलेले आहे. असे तब्बल तीन हवेतूनचे ऑक्सिजन निर्मातीचे  प्रकल्प कार्यन्वीत झाले आहे. त्यामुळे जिल्हा आपल्या मागणीच्या जवळपास 40 ते 50 टक्के ऑक्सिजन निर्मिती ही स्वतच करत आहे. सध्या जिल्ह्याच्या सर्व शासकीय रुग्णालय आणि कोरोना कक्षांना जवळपास हजार ते बाराशे जंबो सिंलेंडरची आवश्यकता आहे.

maharashtra corona case : राज्यात कोरोनाचा हाहाकार, मृतांची आकडेवारी वाढली

त्यापैकीचे 400 सिलेंडर नंदुरबारमध्येच निर्मिती करुन धुळे, औरंगाबाद अशा दोन शहरातून उर्वरीत सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. नंदुरबार मध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प हे जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एक प्रकल्प हा शहादा तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात नंदुरबार शहरात 200, शहादा शहरात 100, नवापुरला 80 तर तळोदा शहरात 50 ऑक्सिजन असे जवळपास 378 शासकीय ऑक्सिजन बेड आहेत.

यापैकी शहादा आणि नंदुरबारची निकट ही या तीन प्रकल्पातून भागवली जाते. तर नवापुर आणि तळोद्यात अशाच पद्धतीने दोन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून येत्या आठवड्याभरात याठिकाणी छोटे खानी हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्रकल्प उभे राहतील. नुसत्या याच प्रकल्पांवर विसंबून न राहता जिल्हा प्रशासनाने लिंडल कंपनीसोबत करार करत लिक्विड ऑक्सिजन निर्मिती जंबो प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाला देखील सुरुवात केली असून येत्या 15 ते 20 दिवसांच्या आत हा प्रकल्प देखील कार्यन्वीत होण्याची शक्यता आहे.

राज्याला remdesivir चा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

त्यामुळेच नंदुरबार हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत मेच्या पहिल्याच पंधरवाड्यात स्वयंपूर्ण होण्याची शक्यता आहे. शासकीय वगळता नंदुरबार मधल्या दोन खाजगी रुग्णालयांमध्ये देखील हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे छोटेखानी प्रकल्प कार्यन्वीत आहे. त्यामुळेच नंदुरबारमध्ये शासकीय आणि अशासकीय असे दोन्ही मिळून हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे आताच्या मितीला तब्बल पाच प्रकल्प सुरू आहे.

विशेष म्हणजे, हे सर्व कोविड लाट आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त नियोजनाचा परिपाक असल्याने राज्यशासनाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकात नंदुरबार प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने आपआपल्या जिल्ह्यात अशा पद्धतीने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प कार्यन्वीत करण्याचे नमुद देखील केले आहे. त्यामुळेच नंदुरबारचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राज्यासाठी पथदर्शीच म्हणावे लागेल.

First published:

Tags: नंदुरबार