मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

maharashtra corona case : राज्यात कोरोनाचा हाहाकार, मृतांची आकडेवारी वाढली

maharashtra corona case : राज्यात कोरोनाचा हाहाकार, मृतांची आकडेवारी वाढली

आज राज्यात 67,160 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

आज राज्यात 67,160 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

आज राज्यात 67,160 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

  • Published by:  sachin Salve

 

मुंबई, 24 एप्रिल : राज्याला कोरोनाने (Corona) विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची (today maharashtra covid cases) संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65 हजार पार पोहोचली आहे. तर 676 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातला सर्वाधिक आकडा आहे.

राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आज राज्यात 67,160 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टकके एवढा आहे.

अवघ्या 1 रुपयात ऑक्सिजन, स्वत: कोरोना अनुभवलेल्या व्यापाऱ्याचा उपक्रम

तर दुसरीकडे 63818 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 34,68,610 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.02 एवढे झाले आहे.

सध्या राज्यात 41,87,675 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 29,246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर आज एकूण 6,94,480 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट!

तर दुसरीकडे, पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण, एप्रिल महिन्यात प्रथमच कोरोना बाधितांच्या सख्येत घट झाली आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा 4 हजारांच्या खाली आला आहे जो गेल्या पंधरवड्यात तब्बल 7 हजारांवर पोहोचला होता.

सॅल्यूट! चार महिन्यांची गर्भवती नर्स रोजे ठेवून कोविड रुग्णांची करतेय सेवा

पुण्यात आज दिवसभरात 3991 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 4789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान आज 74 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे त्यापैकी 19 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरील आहेत.

सध्या पुण्यात 49,472 सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी 1364 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. पुण्यात आतापर्यंत 6443 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील एकूण 3,39,571 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

First published:

Tags: Coronavirus