उस्मानाबाद 24 नोव्हेंबर : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीच्या चरणी 72 तोळे सोनं अर्पण केलं आहे. देवीकडे बोललेला नवस पूर्ण झाल्याने हे दागिने अर्पण केले असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. यावेळी सगळी संकटे संपू दे असं साकडं त्यांनी आई तुळजाभवानी देवीला घातलं आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसोबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. अंबाबाईचा प्रसाद : मंदिराच्या ग्रंथालायाला मिळाली 18 व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखत यावेळी त्यांनी तब्बल 37 लाख 50 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. आपण केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आई तुळजाभवानी देवीची संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन त्यांनी पुजा केली. पुजा करत साडी चोळीचा आहेरदेखील चढवला. सरनाईक यांनी दान केलेल्या सोन्यामध्ये 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा सोन्याचा हार आहे. हे दागिने गेल्या दोन वर्षांपूर्वीच बनवून ठेवले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे देवीला येता आले नाही. त्यामुळे आज देवीचरणी हे दागिने अर्पण केले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. देवीकडे मांडलेलं गाऱ्हाणं पूर्ण झाल्याने कुटुंबीयांना घेऊन दर्शनासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. Kolhapur : देशातील एकमेव मातृलिंग मंदिर, वर्षातून फक्त 3 वेळा उघडतात दरवाजे, Video पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी देवीला हार घालेन असं म्हटलं होतं. पत्नीनेच साकडं घातलं असल्याने तिने दोन वर्षांपूर्वीच सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांनंतर कुटुंबासह देवीच्या दर्शनाला येऊन दागिने अर्पण केले असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.