मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेमध्ये बंड होणार असल्याचं पूर्वीपासूनच माहिती होतं पण..; ओमराजेंचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेमध्ये बंड होणार असल्याचं पूर्वीपासूनच माहिती होतं पण..; ओमराजेंचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Osmanabad, India
  • Published by:  Ajay Deshpande

उस्मानाबाद, 26 जानेवारी :  शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. मात्र सत्ता गेली तरी संघर्ष करायचा असं आम्ही आणि आमदार कैलास पाटील यांनी ठरवलं होतं. आम्ही सत्तेसाठी गद्दारी केली नाही. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेमुळं पद मिळालं मान, सन्मान मिळाल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.  ते शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले ओमराजे? 

शिवसेनेमध्ये होणाऱ्या बंडाची कुणकुण आम्हाला पूर्वीपासून होती, हालचाली दिसत होत्या, असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेतील बंडाची कुणकुण होती. मात्र आम्ही सत्तेसाठी गद्दारी केली नाही. सत्ता गेली तरी संघर्ष करायचा असं आमचं आणि कैलास पाटील यांचं ठरलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळं पद मिळालं सन्मान मिळाला असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

विक्रम काळेंचाही गौप्यस्फोट 

दरम्यान दुसरीकडे याच सभेत बोलताना आमदार विक्रम काळे यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. विक्रम काळे यांच्या या गौप्यस्फोटामुळे कैलास पाटील हे अडचणीत आले आहेत. राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील हे शिंदे गटासोबत होते. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील हे गुजरात बॉर्डरवरून परत आले, असं वक्तव्य विक्रम काळे यांनी केलं आहे. विक्रम काळे यांच्या या वक्तव्यामुळे मात्र कैलास पाटील हे चांगलेच अडचणीत आले.

First published:

Tags: Shiv sena, Uddhav Thackeray