जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...आता त्यांची इच्छा, बच्चू कडूंनी दिला स्वबळावर लढण्याचा नारा, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल म्हणाले...

...आता त्यांची इच्छा, बच्चू कडूंनी दिला स्वबळावर लढण्याचा नारा, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल म्हणाले...

'माझा अधिकारी आणि हक्कच आहे. मी दुसऱ्या विस्तारात असणार आहे. नसलो तरी बच्चू कडू हा बच्चू कडू आहे'

'माझा अधिकारी आणि हक्कच आहे. मी दुसऱ्या विस्तारात असणार आहे. नसलो तरी बच्चू कडू हा बच्चू कडू आहे'

‘माझा अधिकारी आणि हक्कच आहे. मी दुसऱ्या विस्तारात असणार आहे. नसलो तरी बच्चू कडू हा बच्चू कडू आहे’

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद, 21 ऑक्टोबर : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आता एकला चलो रेचा नारा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोबत घेतले तर सोबत, नाहीतर एकट्याने लढणार, असा पवित्रा कडूंनी घेतला. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टाच्या तारखेसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना बच्चू कडू यांनी स्वबळाचा नारा दिला. तसंच, मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराजीही बोलून दाखवली. (sanjay raut : संजय राऊतांना दिलासा नाहीच, यंदा दिवाळी जेलमध्येच!) ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका प्रहार पक्ष एकटा लढणार आहे. जर शिंदे गट आणि भाजपने त्यांची मर्जी असेल आणि त्यांनी आम्हाला सोबत घेतले तर ठीक आहे. नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू, असे सांगत बच्चू कडू यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. ( ‘या आमच्या मध्यप्रदेशला’, पुण्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचं उद्योजकांना आवाहन ) ‘मंत्रिमंडळ विस्ताराचं सांगणं त्याबाबत फार कठीण आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ही काही सोपी बाब नाही. मंत्रिपदासाठी निवड करावी लागते. विस्तार कधी होणार हे सांगणे सध्या कठीण आहे. पण माझा अधिकारी आणि हक्कच आहे. मी दुसऱ्या विस्तारात असणार आहे. नसलो तरी बच्चू कडू हा बच्चू कडू आहे. कसं आहे दूध आटल्यावर खव्वा होतो. त्यामुळे थोडा वेळ लागेल. मी दिव्यांग, कल्याण खाते मागितले आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात